Animal Husbandry : आपल्याकडे पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय करताना दिसतात. हा व्यवसाय करत असताना पशूंच्या योग्य जाती निवडणे खूप महत्वाचे असते. कारण जर चांगल्या जातीच्या गायीची आपण निवड केली तर ती गाय दूध जास्त देते आणि त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आज आपण अशाच एका जास्त दूध देणाऱ्या गायीबद्दल माहिती पाहणार आहोत.
माळवी ही भारतातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गायी जातींपैकी एक आहे. या गायीचे मूळ मध्य प्रदेशातील माळवा पठारी प्रदेशातील असल्याचे मानले जाते. या गायीला महादेवपुरी आणि मंथनी या नावांनी देखील ओळखले जाते. दिसायला ही गाय इतर गायींपेक्षा सुंदर, मोठी आणि सुडौल आहे. त्याचबरोबर ही गायी दूध देखील जास्त देते.
गायींची खरेदी विक्री कशी करणार?
शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप बनविले आहे. ज्यामध्ये तुम्ही घरबसल्या तुमच्या पशूंची खरेदी विक्री करू शकता. Hello Krushi असं या अँच नाव आहे. त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल तर लगेचच हे अँप इंस्टाल करा. या अँपमध्ये तुम्हाला बाजारभाव, हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन मोजणी, इत्यादींची माहिती अगदी मोफत मिळेल त्यामुळे लगेचच हे अँप इंस्टाल करा
किती दूध देते ही गाय?
माळवी जातीची गाय दररोज 12 ते 15 लिटर दूध देते. जे इतर गायींच्या तुलनेत दीडपट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या मोठा फायदा होतो. एवढेच नाही तर माळवी गाईच्या दुधात फॅटचे प्रमाणही इतर गायींच्या तुलनेत जास्त आढळते. माळवी गाईच्या दुधात ४.५ टक्क्यांहून अधिक फॅट आढळते. या जातीची गाय 20 ते 50 हजार रुपयांना मिळते.
या गायीचे वर्णन केले असता, या गायी साधारणपणे तपकिरी किंवा पांढर्या-तपकिरी रंगाच्या असतात. मान, खांदे, कुबड्याचा रंग तपकिरी-काळा असतो. त्याचबरोबर डोळ्यांभोवतीचे केस काळे असतात. पाय लहान पण मजबूत आहेत. त्यांचे खुर काळे आणि मजबूत असते. या गायीचे शिंगे मोठी असतात आणि बाहेरच्या बाजूने बाहेर येतात.
माळवी गाय कुठे आढळते?
पश्चिम मध्य प्रदेशातील माळवा पठार व्यतिरिक्त इंदूर, उज्जैन, रतलाम, देवास, शाजापूर इत्यादी जिल्ह्यांत या गायी आढळतात. त्याचबरोबर हैदराबादमध्येही त्याचे संगोपन केले जाते.