हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या थंडीचे प्रमाण वाढत आहे. यावेळी गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या (Animal Husbandry Management) आणि कोंबड्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. जाणून घेऊ याविषयी महत्वाची माहिती.
वेगवेगळ्या पशुंचे व्यवस्थापन (Animal Husbandry Management)
गाभण गायीचे आरोग्य व्यवस्थापन: गाभण काळात गाईची (Pregnant Cow Health Management) रोगप्रनतकारक शक्ती कमी झालेली असते. तसेच व्यायल्यानंतर चिकाद्वारे वासराला रोगप्रतिकारक शक्ती देण्यासाठी गाईच्या शरीरात विविध रोगांविरुद्ध अँटीबॉडीज तयार करणे आवश्यक असते. अनेक पशुपालक गाभण काळात गायींना लसीकरण करत नाहीत. परंतु गाभण काळात सुद्धा लस उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून गायीच्या शरीरात विविध रोगांविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन ती कालवडीला चिकाद्वारे मिळू शकेल (Animal Husbandry Management).
काही प्रकारचे कृमी किंवा जंत कालवडीला गर्भाशयात संक्रमित करतात. गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात गायीला जंत निर्मुलन करून घ्यावे जेणेकरून त्यांच्या प्रादुर्भावास अटकाव होईल. यासाठी गाभण काळात सुरक्षित असणारी व सर्व प्रकारच्या जंतावर प्रभावी औषधांचा वापर वजनानुसार आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार करावा.
शेळ्यांचे व्यवस्थापन: पैदाशीचे बोकड शेळ्यांपासून (Goat Management) वेगळे ठेवावेत.विणाऱ्या शेळ्यांसाठी गोठ्यात स्वतंत्र व्यवस्था करावी.गाभण जनावरांचा आहार व आरोग्यावर लक्ष ठेवा.
मेंढ्यांचे व्यवस्थापन: कळपाचे थंड हवेपासून संरक्षण करावे. नवजात कोकरे आणि मेंढ्यांचे (Sheep Health Care) थंडीपासून संरक्षण करावे. कोकरांचे शारीरिक वजन घेऊन नोंदी ठेवाव्यात. गाभण मेंढ्या व मेंढे नरांना 400 ग्रॅम पशुखाद्य द्यावे (Animal Husbandry Management).
कोंबडीपालन व्यवस्थापन: संतुलित आहार, प्रतिबंधात्मक उपाय व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन या तीन सुत्रांमुळे कुक्कुटपालन (Poultry Farming Management)व्यवसायाची वाढ होते. वयोगटानुसार कोंबड्यांना संतुलित खाद्य द्यावे.