हॅलो कृषी ऑनलाईन : आहार घेत असताना नेहमी ताज्या आहाराचे सेवन (Fresh Food) करावे. ताजा आहार हा शरीरासाठी लाभदायक असतो. एवढंच नाही तर यामुळे आरोग्य निरोगी राहते. हे फक्त मानवाच्या बाबतीत असू शकतं असं नाही तर हे जनावरांच्या बाबतीत पहायला मिळते. गावाकडे बऱ्याचदा जनावरांना उरलेले शिळे अन्न आहारात देत असतात. परंतु शिळ्या अन्नामुळे (Stale Food) जनावरे आजारी पडून त्यांचे जीवनमान धोक्यात येऊ शकते.

जनावरांची खरेदी विक्रीसाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
बऱ्याचदा भटकी कुत्रे हे शिळे अन्न खात असतात. यामुळे जनावरांना चयापचयाचा आजार होण्याची दाट संभावना असते. परंतु अशातच अती गंभीर परिस्थितीत जनावरांचा मृत्यू होतो. यामुळे जनावरांना शिळे अन्न देऊ नये, त्यांची काळजी घ्यावी. अन्यथा आजारामुळे जनावरांना अधिकाधिक समस्या होते.
जनावरांना या आजारामुळे होऊ शकते ही समस्या
दरम्यान, या चयापचय आजारामुळे जनावरांचे दूध उत्पादन घटते, फॅट कमी लागते, जनावर चारा पाणी कमी घेत असून मागील पायात जनावर लंगडते, पातळ शेण टाकते, त्यामध्ये बुडबुडे, फेस काही वेळा पोट, आतड्यातील खरवडलेली त्वचा, धान्याचे कण दिसू शकतात. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा जनावरांचा मृत्यू होऊ शकतो.
जनावरांचा होऊ शकतो मृत्यू
चयापचय हा आजार तीव्र आणि मध्यम स्वरूपाचा आहे. या आजाराकडे वेळीस लक्ष दिलं नाही तर जनावरांना धोका होण्याची शक्यता अधिक असून रोगनिदानासाठी अवघड होऊन बसते. अंतिम टप्यात जनावराचा मृत्यू देखील होऊ शकतो.