हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारने दुग्ध व्यवसाय आणि पशु संवर्धनाला (Animal Husbandry Scheme) चालना देण्यासाठी दोन महत्त्वाच्या योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन, सुधारित योजने अंतर्गत, शेतकरी (Farmers) आणि इतर इच्छुकांना बँकेकडून घेतलेल्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत (Interest Discount On Loan) मिळणार आहे.
एकत्रित योजनांचा लाभ
यापूर्वी, दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन यासाठी दोन स्वतंत्र (Independent) योजना राबवल्या जात होत्या. आता त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे या दोन्ही क्षेत्रांचा विकास अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.
सुधारित योजनेचा (Animal Husbandry Scheme) लाभ शेतकरी उत्पादक संस्था (FPO), खासगी कंपन्या, वैयक्तिक उद्योजक, सेक्शन आठ नोंदणीकृत कंपन्या, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (Micro, Small and Medium Enterprises) आणि सहकारी दुग्ध संघ (Cooperative Dairy Union) यांना घेता येईल.
योजनेत (Animal Husbandry Scheme) काय समाविष्ट आहे?
- नवीन आणि विद्यमान दुग्ध प्रक्रिया केंद्रांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ दुग्ध प्रक्रिया (Milk Processing And Packaging) आणि पॅकेजिंग.
- विपणन पायाभूत सुविधा, दूध वाहतूक (Transportation) सुविधा आणि संशोधन आणि विकास यांना प्रोत्साहन.
- अक्षय ऊर्जा वापर, मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मिती (Milk Products) आणि पशुखाद्य (Animal Fodder) निर्मिती आणि बळकटीकरण यांसारख्या सुविधांसाठी मदत.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
- अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी (District Animal Husbandry Office) संपर्क साधा.
- आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि पात्रता निकष पूर्ण करा.
- मंजूरी मिळाल्यास, कर्जासाठी (loan) बँकेकडे अर्ज करा आणि 3 टक्के व्याज सवलत मिळवा.
दुग्धव्यवसाय (Dairy Business) आणि पशुसंवर्धनात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना या योजनेमुळे (Animal Husbandry Scheme) मदत होईल. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आणि इतर इच्छुक व्यक्ती आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात आणि त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात. या योजनेमुळे राज्यातील दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.