हॅलो कृषी ऑनलाईन: हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील ‘अनमोल’ हा मुर्रा जातीचा रेडा (Anmol Buffalo From Haryana) ज्याची किंमत 23 कोटी (23 Crore Worth) रुपये आहे, राजस्थानच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळ्यात (Pushkar Mela) सध्या सर्वात मोठे आकर्षण ठरत आहे.
अनमोल नावाच्या या रेड्याची (Anmol Buffalo From Haryana) भव्य उंची, वजन आणि अतुलनीय आहे. त्याच्या या गुणांमुळे केवळ जत्रेतच नाही, तर भारतीय पशुधनाच्या उत्कृष्टतेचे आणि परंपरेचे प्रतीक म्हणून सुद्धा चर्चेचा विषय बनलेला आहे.
दरवर्षी देश-विदेशातून लाखो लोकांना आकर्षित करणारी पुष्कर जत्रा यावेळी अनमोलमुळे आणखी खास बनली आहे. मुर्हा जातीचे वेगळेपण आणि मालकानी घेतलेली विशेष काळजी यामुळे अनमोल जत्रेत सहभागी झालेल्या इतर 15 रेड्यांना मागे टाकून इंटरनॅशनल चॅम्पियनचा किताब (International Champion Title) तर पटकावलाच, पण आपल्या नेत्रदीपक रूपाने जत्रेत आलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अनमोलचे अद्भुत गुण
अनमोल रेड्याची (Anmol Buffalo From Haryana) उंची 5 फूट 8 इंच आणि लांबी 13 फूट आहे. त्याचे वजन अंदाजे 1500 किलो आहे, ज्यामुळे जत्रेत सहभागी होणाऱ्या इतर रेड्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय चॅम्पियनचा किताब पटकावला.
विशेष आहार आणि काळजीचा परिणाम
अनमोल या रेड्याचा (Anmol Buffalo From Haryana) आहार अतिशय खास आहे. दररोज सुमारे 1500 ते 2000 रुपये किमतीचा आहार त्याला दिला जातो, ज्यामध्ये बदाम, काजू, दूध आणि दलिया यांचा समावेश आहे. त्याच्या खाण्यापिण्यासाठी आणि देखभालीवर वर्षाला 3 ते 4 लाख रुपये खर्च होतात. हा विशेष आहार मजबूत आणि आकर्षक ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचा मालक परमिंदर सांगतो की, अनमोलच्या आहारात आणि देखभालीमध्ये कोणतीही तडजोड ते करत नाही.
सन्मान आणि उपलब्धी
पुष्कर जत्रेत जिंकण्यापूर्वीच अनमोलने (Anmol Buffalo From Haryana) अनेक राज्यांमध्ये आयोजित केलेल्या मेळ्यांमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. त्याची उंची आणि सौंदर्य सर्वांना प्रभावित करते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी राजस्थान सरकारचे मंत्री जत्रेत त्याचा गौरव करतील, ही केवळ मालकासाठीच नाही तर संपूर्ण हरियाणासाठी अभिमानाची बाब आहे.
मालकाच्या मेहनतीचे फळ
अनमोलचे (Anmol Buffalo From Haryana) मालक परमिंदर त्याला आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात. अत्यंत प्रेमाने आणि काळजीने त्यांनी ते वाढवले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, परमिंदर म्हणतो की, अनमोल केवळ म्हैस नाही, तर त्याच्या भावना आणि मेहनतीचे फळ आहे. लहानपणापासूनच त्यांनी त्याचे संगोपन केले आहे आणि त्याच्या आहार, आरोग्य आणि प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे.
पुष्कर जत्रेचे आकर्षण
राजस्थानच्या आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळ्यात दरवर्षी लाखो लोक येतात. यावेळी अनमोलने जत्रा आणखी खास बनवली आहे. त्याची उंची, वजन आणि चमकदार काळ्या रंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोक केवळ ते पाहण्यासाठीच नव्हे तर त्यासोबत छायाचित्रे घेण्यासाठी देखील उत्सुक आहेत. जत्रेत आलेल्या पशुप्रेमी आणि शेतकऱ्यांसाठी हा रेडा (Anmol Buffalo From Haryana) प्रेरणादायी आहे.
मुर्राह जातीच्या म्हशी (Murrah Buffalo Breed) भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि उच्च दर्जाच्या म्हशी आहेत. त्यांच्या दुधात प्रथिने आणि चरबी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे या जातीला दुग्धव्यवसायात महत्त्वाचे स्थान आहे. हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये या जातीच्या म्हशींचे विशेष पालन केले जाते. अनमोल हा रेडा (Anmol Buffalo From Haryana) या जातीच्या श्रेष्ठतेचा पुरावा आहेत.