Artificial Rains : महाराष्ट्र सरकार कृत्रिम पाऊस पाडण्याच्या विचारात, दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना करणार मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Artificial Rains : या हंगामात महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनचा पाऊस खूपच कमी झाला आहे. त्यामुळे सध्या या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळातून दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करत आहे. कृत्रिम पावसाने खरीप पिके वाचवता येतील आणि धरणांमधील घटणारी पाणीपातळीही संतुलित करता येईल, असं सरकारच म्हणणं आहे.

पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “आम्ही शास्त्रज्ञांशी सल्लामसलत करून हवामान कृत्रिम पावसासाठी अनुकूल आहे का हे तपासू, आम्ही या विषयावर चर्चा केली आहे.” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, याआधीही भारत सरकारने हे स्पष्ट केले आहे की, पावसाची कमतरता असलेल्या कोरड्या भागात पावसाचे ढग आणण्यासाठी क्लाउड सीडिंगचा समावेश असलेले कृत्रिम पाऊस तयार करण्याचे तंत्र वापरले जाऊ शकत नाही. उलट ज्या ठिकाणी दुष्काळ आहे आणि मुसळधार पावसाचे ढग तेथून जात आहेत अशा ठिकाणीच हे तंत्र वापरले जाऊ शकते.

क्लाउड सीडिंग म्हणजे काय?

क्लाउड सीडिंगसाठी ढगांची उपस्थिती आवश्यक आहे. जेव्हा ढग तयार होतात तेव्हा सिल्व्हर आयोडाइड आणि इतर गोष्टी फवारल्या जातात. त्यामुळे वाफ पाण्याच्या थेंबात बदलते. त्यात जडपणा आहे आणि गुरुत्वाकर्षणामुळे ते पाण्याच्या थेंबाच्या रूपात पृथ्वीवर पडते. महत्वाचं म्हणजे भारतात क्लाउड सीडिंग जास्त यशस्वी होत नाही मात्र ढगांनी साथ दिल्यास ते करणे शक्य आहे.

हवामान अंदाज कुठे पाहणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला दररोजच्या दररोज हवामान अंदाज चेक करायचा असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही दररोजच्या दररोज हवामान अंदाज चेक करू शकता त्याचबरोबर इतर शेती विषयक माहिती देखील तुम्ही या ॲपच्या माध्यमातून घेऊ शकता. जसे की सरकारी योजना, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, पशुंची खरेदी विक्री, इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही या ॲपच्या माध्यमातून घेऊ शकता. त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस नाही

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 9 ते 21 टक्क्यांपर्यंत मान्सूनची कमतरता असल्याने महाराष्ट्र सरकार कृत्रिम पावसाचा वापर करण्यास तयार आहे. राज्यात आठ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यात 772.4 मिमी पाऊस झाला असून या हंगामात प्रत्यक्ष पावसाची नोंद 709.5 मिमी इतकी आहे. त्याच वेळी, महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात 21 टक्के, तर मराठवाड्यात 18 टक्के कमतरता नोंदवली गेली आहे. विदर्भात 9 टक्के कमतरता आहे. कृत्रिम पावसाची गरज असल्याचं बोललं जात आहे.

error: Content is protected !!