हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात पशु आणि पशुपालक शेतकरी (Animal Gratitude) यांच्यात नेहमीच एक ऋणानुबंध पाहायला मिळते. शेतकरी त्याच्याकडील पशुंची एका वडीलाप्रमाणे काळजी घेतो. तर जनावरे सुद्धा शेतकर्यांना लळा लावतात (Animal Gratitude).
जनावर हे शेतकर्यांना नेहमीच फायदेशीर ठरते (Animal Husbandry). गाय किंवा म्हैस दूध देणे बंद झाले तर काही शेतकरी ते विकून टाकतात. पण जे जनावर आपल्याला आयुष्यभर पैसे कमावून देते अशा जनावरांचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून पुण्यातील मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथील संदीप सोरटे यांनी चक्क आपल्या म्हशीचे पेंटिंग (Buffalo Painting) तयार करून घेतले आहे. म्हशीच्या मृत्युनंतर तब्बल 45 हजार रूपये खर्च करून त्या म्हशीचे चित्र तयार करून घेतले (Animal Gratitude).
हे पेंटिंग त्यांनी आपल्या दूध डेअरीमध्ये (Milk Dairy) लावले असून, आयुष्यभर दूध दिलेल्या म्हशीचेही आपण काहीतरी देणं लागतो, ही म्हैस (Buffalo) आपली दैवत होती (Animal Gratitude) असं ते सांगतात.
20 जानेवारी 1996 रोजी सोरटे यांच्या घरी या म्हशीचा जन्म झाला होता. लहानपणी सोरटे यांच्या वडिलांच्या हाताला लागल्यामुळे त्यांनी या म्हशीची आई विकली पिल्लू परत देण्याची बोली केली. त्यानंतर त्यांनी हे पिल्लू जगवले. या म्हशीने त्यांना अनेक वेत दिले. ज्यावेळी ही म्हैस दावणीला होती तेव्हा कुटुंबात आणि व्यवसायात भरभराटी होती (Animal Gratitude) असे सोरटे सांगतात.
संदीप सोरटे यांच्याकडे ही म्हैस जवळपास 29 वर्ष जगली. जन्मापासून सांभाळलेल्या या म्हशीला शेवटपर्यंत सांभाळायचा त्यांचा मानस होता. पण मध्येच त्यांच्या वडीलांनी ही म्हैस विकली, पण संदीप यांनी ती पुन्हा विकत घेऊन आपल्या दावणीला परत आणली.
दरम्यान, पुढे 25 डिसेंबर 2021 रोजी या म्हशीचे निधन झाले. निधन झाल्यानंतर सर्व विधी सोरटे यांनी पार पाडले आणि या म्हशीची आठवण म्हणून त्यांनी एका पेंटरकडून चित्र रंगवून घेतले. या पेंटिंगसाठी त्यांनी 45 हजार रूपये खर्च केले (Animal Gratitude). म्हशीमुळे आपल्याला व्यवसायात खूप फायदा झाल्याचं ते सांगतात.
काळ कितीही बदलला असला तरी जनावरे आणि शेतकरी यांच्यातील प्रेमाचे नाते (Animal Gratitude) नेहमीच राहणार आहे. किमान भारतासारख्या कृषिप्रधान देशात पिढ्यानुपिढ्या हा वारसा चालणार हे नक्की.