Pomegranate Farming: आसामच्या शेतकर्‍यांना आटपाडीच्या डाळिंबाचे आकर्षण; बाग पाहण्यासाठी पोहचले थेट बांधावर!

0
4
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: डाळिंबाची पंढरी (Pomegranate Farming) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आटपाडीला (Atpadi) आसामच्या दोन शेतकर्‍यांनी (Asam Farmers) अभ्यासासाठी भेट दिलेली आहे. र्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये माळरानावर कमी पाण्यात येणार्‍या डाळिंब पिकाची (Pomegranate Crop) माहिती घेऊन आपल्या राज्यात त्याची लागवड करण्याच्या उद्देशाने ते महाराष्ट्रात आले आहेत.

आसाम व अरुणाचल राज्याच्या सीमेवरील बालिजुरी गावातून थेट तीन हजार किलोमीटर वरून रंजन रामाचार्य व बायजू कुमार रामाचार्य या दोन शेतकर्‍यांनी आटपाडीचे डाळिंब (Pomegranate Farming)क्षेत्रातील कृषितज्ज्ञ असलेले अक्षय सागर यांचा सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहत थेट आटपाडी गाठले.

दोन दिवस चाळीसहून अधिक डाळिंब बागांना (Pomegranate Orchard) भेटी देत लागवड, औषध फवारणी, खते, छाटणी, फळ धारणा यासह हार्वेस्टिंग अन्य बाबींचा अभ्यास (Agriculture Field Visit) करून गुटी कलम घेऊन आसामला एक हेक्टर डाळिंब लागवड करण्याचेच त्यांनी मानस व्यक्त केला आहे.

आसामवरून डाळिंब शेती (Pomegranate Farming) विषयीची उत्सुकता व शेतीमध्ये नाविन्याचा ध्यास घेत शेतीमध्ये बदल घडवण्याच्या जिद्दीने आलेले शेतकरी डाळिंब शेतीच्या बागा पाहून आश्चर्य चकित झाले. दरम्यान रामाचारी या शेतकर्‍यांची एकूण 40 एकर शेती असून यापैकी 20 एकर शेतीमध्ये त्यांनी ड्रॅगन फ्रुट, अॅपल बोर, कलिंगड, सुपारी यांची लागवड केली आहे.

त्यांच्या आसाम राज्यामध्ये पारंपरिक असणारी चहा शेती रबर शेतीला त्यांनी बगल देत शेतीमध्ये वेगळे आणि यशस्वी प्रयोग राबविले आहेत. आसाम हा प्रदेश पर्जन्य छायेचा आहे.

सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) पाऊस कमी पडत आहे. त्यामुळे डाळिंब हे पीक कमी पावसाच्या प्रदेशांमध्ये उत्तमरीत्या येते व आर्थिक मोबदला त्यातून चांगल्या प्रकारे मिळत असल्याने पर्जन्यछायेच्या प्रदेशात आटपाडी सारख्या दुष्काळी भागात डाळिंब पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुष्काळी भागातील डाळिंब शेतीची माहिती घेण्यासाठी त्यांनी थेट आटपाडी गाठले असून कृषितज्ज्ञ अक्षय सागर यांच्या माध्यमातून त्यांनी विविध भागांना भेटी दिल्या.

शेतकऱ्यांच्याकडून डाळिंब बागेविषयी (Pomegranate Farming) माहिती करून घेतली आहे. डाळिंब पीक हे सध्या मोठ्या संकटात आहे. मात्र त्याकडे शासनाने कानाडोळा केला आहे. असे असूनही आसामसारख्या राज्यातून डाळिंब लागवडीची माहिती घेऊन त्यांच्या राज्यामध्ये शेतीमध्ये बदल करण्याचा मानस शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.