Ashwagandha Farming : शेतकरी आता पारंपरिक पिकाला कंटाळला असून इतर प्रकारची पिके घेत आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला चांगला नफा देखील मिळत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीमध्ये सतत नवनवीन गोष्टी करण्याचा विचार करत आहेत. सध्याची तरुण पिढी देखील शेती करताना दिसत आहे त्यामुळे तरुण पिढी नवनवीन प्रयोग करून चान्गले उत्पन्न घेत आहे. आज अशाच एका पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत जे कमी वेळात भरपूर नफा देऊ शकतात. स

र्वात कमी किंमतीत खात्रीशीर बियाणे घेण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण ज्या पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत हे पीक सामान्य पीक नसून एक औषधी वनस्पती आहे, ज्याला बाजारामध्ये देखील मोठी मागणी आहे. या पिकाचं नाव आहे अश्वगंधा. अश्वगंधा हे असे पीक आहे जे तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी ठरते यामुळे याला बाजारात देखील मोठी मागणी असते. चलातर मग जाणून घेऊया याची लागवड कधी केली जाते. (Agriculture News)
अश्वगंधाची लागवड कशी केली जाते? (Ashwagandha farming in marathi)
याच्या लागवडीबद्दल पाहिलं तर रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात याची लागवड केली जाते, मात्र यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही खरीप हंगामात पावसाळ्यानंतर याची लागवड केली तर त्याची चांगली उगवण होते. त्याचबरोबर याबाबत कृषी तज्ञ सांगतात की, पावसाळ्यात त्याची रोपे तयार करावीत आणि उशिरा लागवड करून ऑगस्ट किंवा सप्टेंबर दरम्यान शेत तयार करावे असं केल्याचं चांगला फायदा होत असल्याचं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
याची लागवड करताना महत्वाचं म्हणजे शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली व्यवस्था करा, कारण जास्त पाणी अश्वगंधाची धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शेतातून पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रति हेक्टरी अश्वगंधा लागवडीसाठी ४ ते ५ किलो बियाणे लागते. त्याचबरोबर जर पिकाची चांगली काळजी घेतली तर अश्वगंधा पीक ५ ते ६ महिन्यांत पूर्णपणे तयार होते.
अश्वगंधा लागवडीसाठी बियाणे कोणते वापरावे? (Ashwagandha seeds for farming)
जुलै महिन्यात बियाण्याची पेरणी करावी. लागवडीसाठी हेक्टरी ५ किलो बियाणे पुरेसे आहे. पेरणीपूर्वी बियाणे २४ तास थंड पाण्यात बियाणे भिजत ठेवावे. नंतर सुकवावे. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास मॅंकोझेब ३ ग्रॅमची प्रक्रिया करावी. गादी वाफ्यावर रोपे तयार करावीत. साधारणपणे ४५ दिवसांत रोपे तयार होतात.
अश्वगंधाची अभिवृद्धी बियांपासून होते. बिया थेट शेतात पेरतात किंवा गादीवाफे तयार करून पेरल्या जातात. रोपे तयार झाल्यावर त्यांची शेतात लागवड केली जाते. गादी वाफ्यावर बी वापरून रोपे तयार करावीत. बिया ६ ते ७ दिवसांनी रुजतात. रोपे ६ आठवड्यांची झाल्यावर ६० बाय ३० सेंमी अंतरावर लावावीत.
रोप लागवड ऑगस्ट महिन्यात करावी.
Ashwagandha Farming Profit
एका अंदाजानुसार, अश्वगंधाची प्रति हेक्टरी लागवड करण्यासाठी जवळपास 10 हजार रुपये खर्च येतो, परंतु पिकाचा प्रत्येक भाग विकल्यानंतर तुम्हाला 70 ते 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे ही शेती केल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. भारतामध्ये, सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील अनेक शेतकरी याची लागवड करताना दिसत आहे.