Aurangabad News : शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी (Farmer) नेहमीच चिंतेत असतात. दरम्यान औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी (Farmer) संकटात असल्याचे दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक भागात उगवून आलेल्या कोवळ्या पिकाची हरीण, रोही,रानडुक्कर, नीलगाय, मोर हे वन्यप्राणी नासधूस करत फस्त करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.
शेतकरी शेतात कष्ट करून कसेबसे पीक उभे करतात. मात्र ते जर वन्यप्राण्यांनी खाल्ले किंवा त्याचे नुकसान केले तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आता वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सिल्लोड तालुक्यात तर वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात आणि परिसरात नुकतच उगवून आलेल्या पिकांच्या कोवळ्या अंकुरावर वन्यप्राणी डल्ला मारताना दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने या वन्य प्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (Aurangabad News)
बळीराजा संकटात…
राज्यात जरी काही ठिकाणी पावसाने थैमान घातले असले तरी अजूनही काही ठिकाणी म्हणावा असा पाऊस झाला नाही. जुलै महिना संपत आला आहे. मात्र अजूनही म्हणावा असा पाऊस झालेला नाही त्यामुळे पिकांना पावसाची गरज आहे. मागच्या दोन-चार दिवसात झालेल्या रिमझिम पावसामुळे काही प्रमाणात पिकांना पाणी मिळाले आहे. पण मोठा पाऊस न झाल्यास पिके धोका देऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.
एकीकडे पिकांना मिळत नसलेला भाव त्याचबरोबर पावसाची चिंता आणि दुसरीकडे वन्य प्राण्यांचा होणारा त्रास हे पाहता शेतकऱ्यांनी जगाव तरी कसं असं म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे वन वनविभागाने लवकरात लवकर अशा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.