Aushadhi Vanaspati : तुम्हालाही सांधेदुखी, घुडघेदुखीचा त्रास होतोय का? तर मग ‘या’ वनस्पतीच्या पावडरचे करा सेवन; होईल फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Aushadhi Vanaspati : जसे वय वाढत जाते तसे आजारही जास्त उद्भवत जातात वयामानानुसार गुडघेदुखी, सांधेदुखी शरीरावर सूज येणे हे आजार उद्भवत असतात. मात्र सध्या वयोमानानुसार नाही तर तरुण पिढीमध्ये देखील गुडघेदुखी, सांधेदुखी हे आजार दिसून येतात. याचं कारण असं की तरुण शरीरासाठी लागणारे पौष्टिक घटक न खाता बाहेरील जेवण जास्त खातात. यामुळे शरीराला पाहिजे तेवढे पौष्टिक घटक मिळत नाहीत. यामुळे आजकाल तरुण पिढीमध्ये देखील सांधेदुखी तसेच गुडघेदुखी आजार उद्भवत आहेत.

अनेकजण या आजाराने खूप त्रस्त असतात. यावर डॉक्टरांकडून गोळ्या औषध घेऊन देखील काही फरक पडत. नाही मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा वनस्पती बद्दल सांगणार आहोत ज्या वनस्पतीचे सेवन केल्यानंतर तुमची सांधेदुखी असेल गुडघेदुखी असेल त्याचबरोबर शरीरावरील सूज असेल या सर्वांना तुम्हाला फरक पडणार आहे. गोरख असा या झुडूपवर्गीय वनस्पतीचे नाव आहे. या वनस्पतीला काही ठिकाणी सराटे देखील म्हणतात. ही वनस्पती जमिनीवर झुडपांमध्ये आढळते त्याचबरोबर याची पाने हरभऱ्याच्या पानांसारखी असतात. या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

तुम्हाला जर सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्हाला झुडपाळ भागात जाऊन सराटे वेचून आणावे लागतील ते वेचून आणल्यानंतर तुम्हाला त्याची पावडर बनवावी लागेल. ही पावडर सकाळी किंवा संध्याकाळी एक चमचा खावी. ही पावडर खाताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पावडर गावरान तुपामध्ये खाल्ले तर आपला आजार लवकर बरा होईल.

स्त्रियांसाठीही पावडर फायदेशीर

अशक्तपणामुळे बऱ्याचदा स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जाते. यावेळी तूप आणि खडीसाखर सोबत सराट्याच्या पावडरचे सेवन केल्यास मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो. एकदा ही पावडर तयार करून तुम्ही डबी मध्ये भरून ठेवल्यानंतर ती जास्त काळ देखील टिकून राहते. त्याचबरोबर अनेकांना लघवीचा देखील त्रास असतो अशावेळी लोकांनी या पावडरचे सेवन करावे आणि ज्या गर्भवती महिला आहेत त्या महिलांच्या पोटातील बाळाचे पोषणनीट होण्यासाठी गोखरू शतावरी, अश्वगंधा, एकत्र करून दुधासह घ्यावे असे घेतल्यास चांगला फायदा होईल.

Hello Krushi याबद्दल माहिती आहे का?

शेतकरी मित्रांनो तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे सर्वांना अगदी घरी बसून सर्व गोष्टींची माहिती पाहिजे असते. याच गोष्टीचा विचार करून आम्ही देखील शेतकऱ्यांसाठी खास अँप बनवल आहे. ज्याचं नाव आहे Hello Krushi या ॲपच्या माध्यमातून शेतकरी घरी बसून सर्व शेती संबंधित घटकांची माहिती घेऊ शकतात. यामध्ये बाजारभाव असतील हवामान अंदाज, सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती शेतकरी घरी बसल्या अगदी काही मिनिटात घेऊ शकतात, त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!