Auspicious Plants for Home: घरात सकारात्मकता, चांगली ऊर्जा आणि सुख समृद्धीसाठी ‘ही’ झाडे नक्की लावा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Auspicious Plants for Home: सध्या बहुतेक घरी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आणि शोभेची झाडे लावलेली दिसतात. या रोपांमुळे घराचे सौंदर्य तर वाढतेच शिवाय निसर्गाच्या जवळ जाण्याचा अनुभव सुद्धा तुम्ही या घरातील झाडांमुळे घेऊ शकता.

परंतु जर तुम्हाला सांगीतलं की ही शोभेची झाडे फक्त घराचे सौंदर्यच वाढवित नाही तर घरात सकारात्मक बदल सुद्धा घडवून आणतात, तर होईल सोने पे सुहागा!

वास्तुशास्त्रानुसार घरात आणि घराच्या सभोवतालची अनेक झाडे हवा शुद्ध करतात आणि आश्चर्यकारक फायदे देतात जसे,घरातील सकारात्मकतेत भर घालू शकतात. तर जाणून घेऊ या घरासाठी शुभ झाडांविषयी (Auspicious Plants for Home).

१)    बांबू वनस्पती (Bamboo)

वास्तूनुसार, बांबू वनस्पती तुमच्या घरात आनंद, सौभाग्य, कीर्ती, शांती आणि संपत्ती आणते. कुणालाही भेट म्हणून देण्यासाठी ही एक शुभ वनस्पती (Auspicious plants for Home).  मानली जाते. ही वनस्पती घरात ठेवण्यासाठी शुभ दिशा घराचा पूर्व किंवा आग्नेय कोपरा आहे.

२)    कडुलिंबाचे झाड (Neem Tree)

कडुनिंबाचे झाड औषधी गुणधर्मामुळे आरोग्यविषयक फायद्यामुळे सर्वांना परिचित आहे. परंतु हे झाड आजूबाजूची चांगली उर्जा सुद्धा वाढविते. घराच्या वायव्य कोपर्‍यात कडुलिंबाचे झाड लावणे शुभ असते.

३)    मनी प्लांट (Money Plant)

मनी प्लँट (Auspicious Plants for Home) हे घरातल्या व्यक्तींसाठी भाग्य कारक मानले जाते.  वास्तुशास्त्रानुसार, घराच्या समोरच्या खोलीच्या आग्नेय कोपऱ्यात किंवा घराच्या कॉरिडॉरमध्ये मनी प्लांट लावल्यास  आश्चर्यकारक फायदे होते.

४)    लॅव्हेंडर वनस्पती ( Lavender)

ही सुगंधित वनस्पती घरातील तणाव कमी करून सुसंवाद वाढविण्यास मदत करते. घरात सकारात्मकता ओढून आणते, मन शांत करते. या वनस्पतीसाठी उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशा शुभ समजली जाते.

५) पीस लिली (Peace Lily)

पीस लिली वनस्पती हे प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. बेडरूममध्ये ठेवल्याने वाईट स्वप्ने पडत नाही व शांत झोप लागते. बेडरूममध्ये दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ही वनस्पती ठेवावी.

६)    स्नेक प्लांट (Snake Plant)

वास्तूनुसार, स्नेक प्लांट खिडकीजवळ ठेवल्याने घरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविते. खोलीत शांत वातावरण निर्माण करते. घरातील खोली हानिकारक विषारी पदार्थांपासून मुक्त होते. घरातील दक्षिण, पूर्व आणि आग्नेय दिशा या वनस्पतीसाठी शुभ समजली जाते.

७)    क्रायसॅन्थेमम (Chrysanthemum)

पिवळा क्रायसॅन्थेमम समाधान, तेज आणि आत्मविश्वासाची भावना वाढवते. राहण्याची खोलीत खिडकीजवळ हे रोप ठेवणे योग्य मानले जाते.

८)    ऑर्किड (Orchid)

ऑर्किड्स हे घरासाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पतींपैकी (Auspicious Plants for Home) एक आहे. हे सकारात्मकता, यश, विपुलता आणि कुटुंबाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. घराचा नैऋत्य कोपरा या रोपासाठी शुभ आहे.

९)    केळीचे झाड (Banana)

केळीचे रोप हे घरासाठी सर्वोत्तम वनस्पतींपैकी (Auspicious Plants for Home) एक मानले जाते कारण ते पवित्र आणि पूजनीय आहे. हे रोप भगवान विष्णूचे प्रतीक आहे. लोक अनेकदा भगवान विष्णूसोबत केळीच्या रोपाची पूजा करतात. वास्तूनुसार घराच्या ईशान्य दिशेला केळीचे रोप लावावे.

१०)  डॅफोडिल (Daffodil)

डॅफोडिल फ्लॉवर हे घरासाठी सर्वोत्तम वास्तु वनस्पतींपैकी एक आहे. ही वनस्पती विश्वास, सत्य आणि क्षमा यांचे प्रतिक आहे.घरातल्या मालकासाठी नशीब आणणारी आहे.  उत्तम परिणामासाठी ही वनस्पती घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावी. या रोपाची परंतु चुकूनही डॅफोडिलची बौने (ठेंगणी) प्रजाती निवडू नये.  

११)  रबर प्लांट (Rubber Plant)

घरासाठी रबर वास्तू रोपे आर्थिक समृद्धी, संपत्ती आणि व्यावसायिक यश मिळवून देते. रबर प्लांट नेहमी आग्नेय दिशेला ठेवावे अन्यथा ते दुर्दैव आणू शकते.

१२)  जेड (Jade)

जेड वनस्पती नशीब आणि समृद्धी आणण्यासाठी ओळखली जाते, हे मैत्रीच्या वाढीचे प्रतीक आहे. वास्तूनुसार जेड वनस्पती आग्नेय दिशेला ठेवावी.

१३)  चमेली (Jasmine)

चमेलीच्या मनमोहक सुगंधामुळे क्षणात मूड चांगला होतो. चमेली चिंता आणि तणाव कमी करते, झोप सुधारते. वास्तुशास्त्रानुसार, चमेलीची वनस्पती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नातेसंबंधात प्रेम वाढवते (Auspicious Plants for Home). ते घरामध्ये दक्षिणाभिमुख खिडकीजवळ ठेवावे. घराबाहेर असल्यास ते पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेकडे असावे.

१४)  कोरफड (Aloe vera)

घरात कोरफडीचे रोप ठेवणे फायदेशीर आहे कारण ते घरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते. घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता आणते. कोरफडीचे रोप नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे.

१५)  गोल्डन पोथोस (Golden Pothos)

घरात सकारात्मकता पसरवून, संपत्ती आकर्षित करण्यासाठी ही वनस्पती ओळखली जातात. विशेष म्हणजे गोल्डन पोथोसची पाने चिंता आणि तणावापासून आराम देतात. फक्त लक्षात ठेवा की ते तुमच्या घराच्या ईशान्य भागात ठेवू नका उत्तर दिशेला ठेवा.

१६) प्युनी (Peony)

प्युनी एक सुंदर फुलांची वनस्पती आहे जी प्रेम आणि आशावादाचे प्रतीक आहे. सकारात्मकता आणि आशावाद आणण्यासाठी वास्तू आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात वनस्पती ठेवण्याचा सल्ला देते. प्रणय वाढवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात चांगल्या नशीबासाठी तुमच्या जोडीदाराला प्युनी भेट देऊ शकता.

१७)  झेंडू (Marigold)

वास्तुशास्त्रानुसार झेंडूच्या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. सर्वोत्तम दिशा उत्तर किंवा पूर्व दिशा आहे. तसेच, प्रवेशद्वारावर ठेवल्यास ते नशीब आणण्यास मदत करते.

१८) हिबिस्कस (Hibiscus)

वास्तूशास्त्रानुसार हिबिस्कस घरात सकारात्मकता आणि उत्साही ऊर्जा (Auspicious Plants for Home) पसरविण्यास मदत करते. तसेच मंगल दोष दूर होण्यास मदत होते. वनस्पती ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर किंवा पूर्व आहे.

error: Content is protected !!