Bamboo Farming : बांबू शेतीमधून खरंच चांगले पैसे मिळतात का? सरकार किती रुपये अनुदान देते? जाणून घ्या याबद्दल A टू Z माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bamboo farming : पारंपारिक पिकांना फाटा देत वेगळ्या पिकांच्या लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न शेतकरी सतत करत असतात. तुम्हीसुद्धा असा प्रयत्न करायचा विचार करत असाल तर बांबूची शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ज्या शेतकऱ्यांना शेती मधून चांगले पैसे कमवायचे आहेत त्यांनी एकदा बांबूची शेती नक्की करावी. शेतकऱ्यांना श्रीमंत बनण्यासाठी बांबू शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो असे अनेक तज्ञांचे म्हणणं आहे. तुमची काही जमीन पडीक असेल किंवा एखाद्या जमिनीत पाण्याचा प्रश्न असेल तर अशा ठिकाणी तुम्ही बांबू लागवड करून चांगले पैसे कमावू शकता.

बांबूचा वापर वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये केला जातो त्याचबरोबर फर्निचर तयार करण्यासाठी अनेक अनेक कामांसाठी बांबू वापरले जातात. भारतात दरवर्षी सात दशलक्ष कोटी रुपये किमतीच्या बांबूची आयात होते. म्हणूनच आता सरकारने बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान सुरु केले आहे. तुम्हीसुद्धा गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप डाउनलोड करून शासकीय अनुदान घरबसल्या मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात बांबू शेती कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती.

बांबू शेतीसाठी सरकार देते अनुदान

देशातील बांबूचे उत्पादन वाढावे यासाठी केंद्र सरकार देखील अनुदान देत आहे. केंद्र सरकारने यासाठी बांबू मशीन सुरू केला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू शेती करण्यासाठी प्रति झाड 120 रुपये शासकीय अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा देखील होत आहे. देशात सतत बांबूला मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही जर बांबूची शेती सुरू केली तर तुम्हाला देखील यामधून चांगला आर्थिक फायदा मिळेल.

बांबूच्या शेतीचा नेमका हंगाम कोणता?

कोणत्याही पिकाची लागवड करायची म्हटली की, त्याला हंगामानुसार लागवड करणे गरजेचे असते जर आपण हंगामानुसार लागवड केली तर आपले पीक देखील चांगले येते आणि त्यातून आपल्याला उत्पन्न निघून चांगला नफा देखील मिळतो. मात्र बांबूच्या शेतीबाबत जरा काही वेगळेच आहे बांबूची शेती हंगामानुसार केली जात नाही त्याचबरोबर अन्य पिकांसाठी जसा वेळ द्यावा लागतो तसा वेळ या पिकासाठी द्यावा लागत नाही.

बांबूची लागवड कशी करावी?

तुम्ही एकदा बांबूची लागवड केली की चार वर्षानंतर बांबूची कापणी केली जाते. त्याचबरोबर बांबू लागवड करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांबूच्या दोन झाडांमधील अंतर पाच फूट ठेवावे लागतं/ यानुसार तीन वर्षांमध्ये सुमारे 240 रुपये प्रति झाड खर्च येतो यामध्ये सरकार तुम्हाला 120 रुपये प्रति झाड याप्रमाणे अनुदान देत आहे.

या गोष्टींची काळजी घ्या

तुम्ही जर बांबूची शेती करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. तर तुम्हाला यातून चांगला फायदा होईल नाहीतर तुम्हाला यामधून तोटा देखील होऊ शकतो. शेतकऱ्यांनो बांबूची शेती सुरू करण्याआधी बांबू विषयी सर्वांगीण माहिती घेणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या जातीच्या बांबूची लागवड करायची आहे आणि त्याची विक्री देखील कशा पद्धतीने करणार आहेत या सर्व गोष्टी ठरवाव्या लागतील.

बांबूची लागवड करायचं म्हटलं तर बांबूच्या जवळपास 136 जाती आहेत. त्यामुळे लागवडीच्या अनुषंगाने तुम्हाला काही शंका देखील निर्माण होऊ शकतात त्यामुळे यासाठी तुम्हाला कृषी विभागातल्या काही तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तुम्हाला कृषी विभागाच्या तज्ञांकडून याबद्दलची पूर्ण माहिती लागवड आधीच माहित असणे खूप गरजेचे आहे. तरच तुम्ही बांबूची शेती चांगल्या पद्धतीने करू शकता. निश्चित माहिती घेऊनच याची लागवड करा उगाच घाई करून लागवड करण्यात काहीही उपयोग नाही.

error: Content is protected !!