हॅलो कृषी ऑनलाईन । हल्ली शेती करायची म्हणजे अनेकांना खूपच त्रासदायक वाटते. मात्र संचारबंदीमुळे रोजगारांची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेतीचे महत्व लोकांना समजते आहे. उत्तर प्रदेश मधील कानपूरच्या अखिलेश सिंह यांनी आपल्या शेतीच्या जोरावर अनेक परप्रांतीय आणि प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला ज्यामुळे या मजुरांना पुढे प्रवास करण्याचा मार्ग निर्माण झाला. शेती करणारे सामान्य शेतकरी पासून ते आता सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण बनले आहेत. ते त्यांच्या केळीच्या शेतीतून दरवर्षी २० -२५ लाख रुपये नफा मिळवीत आहेत. सध्या त्यांच्या गावात इतर धान्यांची पारंपरिक शेती केली जाते मात्र अखिलेश यांनी वर्तमानपत्रातून प्रगतिशील शेतकऱ्यांची प्रेरणा घेऊन केळीची शेती करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला त्यांनी कमी जागेत केळीची शेती करायला सुरुवात केली. हे पीक तयार व्हायला साधारण १४ महिने वेळ जातो. त्यांच्या लक्षात आले कि सर्व खर्च जाऊन जवळपास १ लाख रुपये बचत झाली आहे. इतर उत्पादनांच्या तुलनेत हे उत्पन्न अधिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग दरवर्षी थोडी थोडी करत त्यांनी ही शेती वाढविली. आणि वाढणाऱ्या उत्पन्ना सोबत त्यांना आत्मविश्वास आला. ते दरवर्षी १० लाख रुपये वाचावीत आहेत. याशिवाय त्यांनी गावातच प्लांट तयार करून केली पिकवून बाजारात विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. ज्यात त्यांना वार्षिक १० ते १५ लाख रुपये उत्पन्न मिळते.
संचारबंदीत जेव्हा बहुतांश लोक बेरोजगार झाले तेव्हा त्यांनी ५० हुन अधिक लोकांना रोजगार दिला. आधीच त्यांच्यासोबत १५ ते २० लोक काम करत आहेत. जेव्हा अशी स्थिती निर्माण झाली तेव्हा त्यांनी बेरोजगार लोकांना बोलावून गावागावात फेरी मारून केली विकली. जयतु अशा लोकांना रोजगार मिळाला आणि त्यांनाही पैसे मिळाले. अखिलेश यांना दोन मुले आहेत. एक मुलगा सैन्यात जाण्याची तयारी करत होता मात्र शेतीत नफा आणि काम वाढले तेव्हा त्यांच्या मुलालाही त्यांनी शेतीकामात लावले. नोकरी करून केवळ स्वतःची सोया करण्यापेक्षा या कामात मदत करून गावातल्या अनेक लोकांची सोया करतील हे उत्तम असल्याचे ते सांगतात.