हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

डोक्यावर पांढरी चंद्रकोर असलेला ‘बंड्या’ बोकड खातोय भाव; काय आहे किंमत?

हॅलो कृषी ऑनलाईन : वय जेमतेम दोन, सव्वादोन वर्षे.. पूर्ण काळा कुट्ट असा हा निरोगी धष्टपुष्ट ‘बंड्या’… पण या बोकडाच्या डोक्यावरील पांढरी चंद्रकोर पाहताक्षणी सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. सांगलीच्या किरण करांडे यांचे हे बोकड सध्या चांगलाच भाव खाणार असं दिसतंय. डोक्यावर चंद्रकोर असलेल्या या बोकडाची किंमत सव्वा लाख ते दोन लाख आहे.

मागच्या ४-५ वर्षांपासून वडिलोपार्जित शेळी पालनाचा व्यवसाय करांडे कुटुंब करते. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शाळगाव हे करांडे यांचे मूळ गाव. त्यांच्याकडे सध्या जवळपास ३० गावठी शेळ्या आहेत. किरण यांनी इलेक्ट्रॉनिकस डिप्लोमा केला आहे. कोरोना काळात त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेळी पालनाच्या व्यवसायात लक्ष घातले. याच काळात त्यांच्या शेळ्यांच्या काळपात या डोक्यावर चंद्रकोर असलेल्या बोकडाचा जन्म झाला.

विशेष म्हणजे हे डोक्यावर चंद्रकोर असलेले बोकड ४० किलो वजनाचे असून निरोगी आहे. त्याला जन्मल्यापासून कोणताच आजार झाला नाही असे किरण सांगतात. नैसर्गिक पद्धतीने त्यांचे पालनपोषण करांडे कुटुंबाने केले आहे. येत्या १० तारखेला बकरी ईद आहे. त्यानित्ताने या डोक्यावर चंद्रकोर असलेल्या बोकडाला विशेष मागणी आहे. या बोकडाची किंमत सव्वा लाख ते दोन लाख करांडे यांनी सांगितली आहे. या बोकडाला चांगली किंमत मिळेल अशी आशा किरण करतायत.

(टीप – तुम्हला हे बोकड खरेदी करायचे असल्यास किरण करांडे यांना संपर्क करू शकता.)

किरण करांडे
संपर्क क्र – 8437304339

error: Content is protected !!