सावधान ! बिबट्या वस्तीत घुसला…! काय घ्याल खबरदारी ? जाणून घ्या …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बिबट्या वस्तीत घुसला…! बिबट्या शहरातसुद्धा …! अशा अनेक बातम्या आपल्याला वाचायला मिळत असतील. वन्यप्राणी आणि मानव यांचा हा संघर्ष काही नवा नाही. मात्र आता बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केवळ कुत्री किंवा पाळीव जनावरेच नाही तर बिबट्याने लहान मुले, शेतात काम करणाऱ्या महिला, पुरुष यांच्यावर देखील हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आलया आहेत. विशेषतः शेतात रात्रीच्या वेळी, आसपास जंगल असणाऱ्या भागात, नदी किंवा पाणवठा जवळ असणाऱ्या भागात बिबट्याचा हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बिबट्या शिकरीच्या शोधात मानवी वस्तीत येतात.

बिबट्या हा अतिशय लाजाळू प्रकारचा प्राणी आहे. माणसाची चाहूल लागताच तो आपला रस्ता बदलून दूर निघून जातो. बिबट्या नेहमी त्याच्या उंचीत येणाऱ्या, नजरेच्या उंचीत येणाऱ्या गोष्टींवरच हल्ला करतो. तो सहसा त्याच्या उंचीपेक्षा अधिक उंचीच्या प्राणांवर हल्ला करत नाही. त्यामुळे शेतात किंवा आडमार्गाला बसताना आपण बिबट्याचे भक्ष बनणार नाही असे बस. कारण तुम्ही बसलेले असताना मागून तुम्ही माणूसच आहेत हे बिबट्याला कळेलच असे नाही. आणि अशावेळी तो तुमच्यावर हल्ला करू शकतो. तेव्हा आपण थोडीशी काळजी घेतली तर माणूस अन बिबट्या हा संघर्ष सहज टाळता येऊ शकतो. बिबट्या प्रवरण क्षेत्रात काय काळजी घ्यावी याची माहिती घेऊया…

काय घ्याल खबरदारी…

१) रात्रीच्या वेळी एकट्यानं बाहेर पडणे टाळा, बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो.

2) पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा.

3) रात्रीच्यावेळी दरवाजाचे व्यवस्थितरीत्या लॉक लावून बंद करा तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणं टाळा.

4) रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटे सोडू नका.

5) रात्री एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च व काठी बाळगा मोठ्याने म्युझिक लावा.

6) घरापासून थोडे लांब सुरक्षित अंतरावर पीक लावा. घराजवळ रात्रीच्यावेळी मोठे लाईट लावा. घराच्या आसपास झाडंझुडपं असल्यास तो परिसर स्वच्छ ठेवा.

7) घरातल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांच्याकडे आकर्षित होतो.

8) अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा. बिबट्याला त्याच्या मार्गानं जाऊ द्या त्याला डिवचण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि तात्काळ वन विभागाला कळवा.

९) काही संशयास्पद आढळल्यास त्वरित वन विभाग यांच्या 1926 ला संपर्क करा

१०) रात्री अपरात्री किंवा अगदी दिवसही आडमार्गाने फिरता मानेला एखादा टॉवेल गुंडाळा. जेणेकरून बिबट्याने हल्ला केलाच तर तुम्हाला कमी इजा होईल.

११) लघुशंका वगैरेकरता रात्रीच्यावेळी उघड्यावर बसणे टाळा. कारण तुम्ही जेव्हा खाली बसता तेव्हा बिबट्याला तुम्ही त्याची शिकार वाटता.

Leave a Comment

error: Content is protected !!