Bee Keeping Training : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, मधमाशीपालन प्रशिक्षणासाठी तत्काळ करा अर्ज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील जे शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिकापालन (Bee Keeping Training) व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. अशा शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म व लघू आणि मध्यम उद्यम मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पुणेस्थित ‘केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून’ शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिकापालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. संस्थेने यावर्षीच्या मधुमक्षिकापालन प्रशिक्षण (Bee Keeping Training) कार्यक्रमासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले आहेत.

केंद्र सरकारची ‘केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्था (Bee Keeping Training) ही खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अखत्यारीत काम करते. ही देशपातळीवर मधुमक्षिकापालनासंदर्भात प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था आहे. संस्थेकडून शेतकऱ्यासांठी एकूण पाच प्रशिक्षण कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पहिला ‘मधमाशापालन प्रमाणपत्र’ हा एका महिना कालावधीचा, ‘अल्पावधी मधमाशापालन’ हा दुसरा पाच दिवसांचा, तर ‘राजान्य, पराग, प्रपोलीस, मेन, संकलन व संरक्षण प्रशिक्षण’ हा तिसरा पाच दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. याशिवाय ‘मध परीक्षण प्रशिक्षण’ हा चौथा पाच दिवसांचा आणि ‘आग्या माश्यापासून मध संकलन’ हा पाचवा पाच दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. शेतकरी आपल्याला हव्या त्या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.

कुठे कराल अर्ज? (Bee Keeping Training For Farmers)

शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालन व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण घ्यायचे असल्यास ते संस्थेच्या पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेल्या कार्यालयाला भेट देऊ शकता. किंवा अर्ज प्रक्रिया व इतर माहितीच्या चौकशी करता संस्थेच्या 020-25675865, 25655351 या क्रमांकांवर किंवा प्रशिक्षण विभागाच्या 8237421963 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करु शकतात. शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास ते आपला अर्ज [email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.

‘या’ सुविधा उपलब्ध

संस्थेमध्ये मधप्रक्रिया सयंत्र आणि बॉटलिंग युनिट देखील कार्यरत आहे. त्यामुळे आधीपासून मधुमक्षिकापालन करणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांना आपल्या कच्च्या मधाला प्रक्रियेसाठी पाठवता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालनासाठी सेराना व मेलिफेरा बॉक्ससाठी लागणारा मेणपत्रा हवा असेल ते संस्थेला भेट देऊन खरेदी करू शकतात. या व्यतिरिक्त एक स्किल्ड लेबर कंत्राटी बेसिस एक वर्षाकरिता (25-50 एपीस सेरेना कोलोनी सांभाळ करण्याचा अनुभव आहे) अशा उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. स्किल्ड लेबर कंत्राटी पदासाठी इच्छुकांनी आपला बायोडाटा 10 दिवसांच्या आत संस्थेच्या मेलवरती पाठवावा असे संस्थेने म्हटले आहे.

error: Content is protected !!