Beet Lagwad : बिट हें थंड हवामानातील येणारे पीक असून याला रंग, चव व उत्पादन चांगल्या प्रकारे येते. याचा वापर दररोजच्या आहारात केला जातो. सॅलेड, सरबत, कोशिंबीर, चटणी, रक्त वाढीसाठी याची चांगले मदत होते. भारतात पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र या राज्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. बाजारात देखील यांची चांगली मागणी आहे. आजच्या लेखामध्ये आपण बिट लागवडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
जमिनीचा प्रकार-
बिटच्या लागवडीसाठी भुसभुशीत,पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते. तसेच भारी जमिनीत बीटाची लागवड केल्यास बीटाच्या मुळाचा आकार वाकडा होतो. या साठी जमिनीचा सामू हा ६ ते ७.५ असावा. तसेच ९ते १० सामू असणाऱ्या क्षारयुक्त जमिनीत बीटाची वाढ चांगले होते तसेच बीट ची महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवड केली जाते. Beet Lagwad
हवामान-
बिट हें थंड हवामानातील पीक असून या काळातील हवामान पोषक असते बीटची रब्बी हंगामात ऑक्टोबर मध्ये बी पेरणी केली जाते परंतु महाराष्टामध्ये जून व जुलै मध्ये बियांची पेरणी केली जाते. (Beet Lagwad)
पिकाची जात-
डेट्राईट डार्क रेड, क्रीम्सन ग्लोब, अर्ली वंडर
लागवड-
एक हेक्टर साठी ७ ते १० किलो बियाणे लागते. बियाणांची लागवड पेरून किंवा टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी २ बिया टोकून लागवड करावी बीटासाठी ४५ सेमी अंतरावर सरीवर करावी आणि सरी वरंबा १५ ते २० से मीटर अंतरावर बियाणे लागवड करावी. बियाणे उगवून आले की विरळणी करून एका ठिकाणी १ च रोप ठेवावे. तसेच बी लागवड करण्या पूर्वी बियाणे राञभर भिजत ठेवावे म्हणजे बियाणे चांगले उगवते. बियाणे जमिनीत लागवड करण्यापूर्वी जमिनीत ओलावा असावा, बीट ची लागवड ३०-४५ बाय १५ ते २० सेमीटर अंतरावर वर करावी.
खत व्यवस्थापन-
लागवडी च्या वेळी १५ ते २० गाड्या शेणखत टाकावे ६० ते ७० किलो नत्र ,१०० ते १२० किलो स्फुरद आणि ६० ते ७० किलो पालाश हेक्टरी दयावे. नत्राची अर्धी मात्रा व स्फुरद आणि पालाशची पूर्ण मात्रा बियांची लागवड करताना दयावी व नत्राची उरलेली अर्धी मात्रा ही पेरणी नंतर ४ ते ६ आठवडयांनी द्यावी. Beet Lagwad
पाणी व्यवस्थापन-
कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा. जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते. पिक वाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात पिकाला ८-१० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
रोग नियंत्रण आणि त्यावरील उपाय –
१) मावा- पानातील रस शोषण करतो त्यामुळे वेली निस्तेज होते पिकाची वाढ खुंटते.
उपाय- टाटा माणिक – ८ ते १० ग्राम १५ लिटर च्या पंप ला घेऊन फवारणी करावी. अथवा निमार्क २५- ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) तुडतुडे – पानातील रस शोषण करते.
उपाय- अरेवा ८ ते १० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अथवा निमार्क २५ -३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3) सफेद माशी-पानातील रस शोषण करते. उपाय- उलाला ८ ते १० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) पाने खाणारी अळी व फळातील अळी – पाने खाते व फळाच्या आत मध्ये अळी तयार होते त्यामुळे फळ वाकडे होते.
उपाय- निमार्क २५ -३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व किडलेली फळे काढून टाकावी नंतर फवारणी करावी.
५) मर रोग – पाणी अतिजास्त दिलेल्या मुळे किंवा वातावरणातील बदलामुळे रोपाची मर होते.
उपाय – पिकाच्या आवश्यक्ते नुसार पाणी दयावे तसेच रोपाच्या बुडा जवळ बुरशीनाशका चे ड्रिचिंगी करावे किंवा फवारणी करणे.
उत्पादन-
बिटाची काढणी ७० ते ७५ दिवसांनी करावी. बीटच्या कंदाची वाढ ३ ते ५ से मी झाली की हाताने उपटून काढणी करावी तसेच काढणी करताना मुळ्याना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणी नंतर कंदाची प्रतवारी करावी तसेच कंद विक्रीला पाठवताना त्याची पाने काढून टाकावी व कंद स्वछ धुणे. पॅकिंग हें प्लास्टिक च्या पिशवीत केल्यास कंद जास्त काळ चांगले राहतात. तर ४ ते ६ जुड्या बांधून विक्रीस पाठवले जातात. याचे सरासरी उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन इतकं मिळते.
बाजारभाव कुठे पाहणार?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर बीटचा किंवा इतर तुमच्या शेतमालाचा बाराजभव जाणून घ्यायचा असेल तर काळजी करायची गरज नाही. तुम्हाला फक्त एक छोटे काम करायचे आहे. त्यानंतर तुम्ही दररोजचा बाजारभाव चेक करू शकता. पहिल्यांदा तुम्ही प्लेस्टोअरवर जा त्या ठिकाणी Hello Krushi असं टाका आणि आपले हे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला बाजारभाव त्याचबरोबर तुमच्या गावाजवळच्या रोपवाटिकांची माहिती, सरकारी योजना, जमीन मोजणी अशा अनेक गोष्टींची माहिती मिळेल ती पण अगदी मोफत. त्यामुळे लगेचच Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.