हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना अमलात आणत असते पुणे जिल्हा परिषद आणि कृषी विभाग अंतर्गत नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना अमलात आणण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 200 लिटरचा सोलर वॉटर हीटर स यंत्र बसवण्यासाठी सुद्धा अनुदान दिले जाते. शिवाय शारदा शेतकरी माता भगिनी योजना देखील पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून अमलात आणली जात आहे. आता अनुक्रमे या तिन्ही योजना संदर्भातली माहिती घेऊयात.
1) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना
पुणे जिल्हा परिषद पुणे कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमान राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत गिरगाय, शेतकरी प्रशिक्षण, गांडूळ खत निर्मिती, जैविक खत किंवा कीटकनाशक, बायोमेडिक खत युनिट, सेंद्रिय शेती याकरिता एकत्रित मानधन 65 हजार रुपये मिळते. या योजनेत सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत हे 22 ऑगस्ट 2022 इतकी आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यास तयार असल्याबाबत प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थ्यांनी स्वतःच्या शेतावर कंपोस्टिंग, सोनखत, जैविक खत, निंबोळी पेंड, जीवामृत, दशपर्णी अर्क इत्यादी जैविक बाबींचा अवलंबन करणे अपेक्षित आहे. या योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
अर्जसोबत कागदपत्रे
— सातबारा किंवा आठ अ दाखला
— आधार कार्डची झेरॉक्स
— बँक पासबुक झेरॉक्स
— किमान तीन एकर आणि कुटुंबाचे जास्तीत जास्त दहा एकर जमीन असावी.
2) शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 200 लिटरचा सोलर वॉटर हीटर संयंत्र
या योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे या अर्जासोबत सातबारा किंवा आठ अ चा दाखला आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स धारण क्षेत्र जास्तीत जास्त दहा एकर पर्यंत असावे अशी अट देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत 22 ऑगस्ट 2022 इतके आहे. या तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करावयाचे आहेत.
शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर सोलर वॉटर हीटर संयंत्र 200 लिटर क्षमता घेण्यासाठी अनुदान देण्यात येते. विहित तांत्रिक मापदंडाचे सोलर वॉटर हीटर स यंत्र 200 लिटर क्षमता खरेदी केल्यानंतर खरेदी समितीने निश्चित केलेल्या रकमेच्या 75 टक्के अनुदानास शेतकरी पात्र राहील खरेदी रोखीने किंवा कॅशलेस पद्धतीने व्यवहार करणे आवश्यक आहे.
MNRE/MEDA मान्यता प्राप्त उत्पादकांकडून सदरचे सोलर वॉटर हीटर सयंत्र खरेदी करणे बंधनकारक आहे. त्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास एकाच संयंत्रासाठी लाभ देण्यात येईल.

3) शारदा शेतकरी माता भगिनी योजना
महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता ही योजना आखण्यात आली आहे या योजनेअंतर्गत विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिलांसाठी पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी देखील अंतिम मुदत 22 ऑगस्ट 2022 ही आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात वास्तव्य व शेतजमीन असणाऱ्या विधवा शेतकरी महिला घटस्फोटीत शेतकरी महिला परी तक्त्यात शेतकरी महिला व निराधार शेतकरी महिला सहभाग घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम रुपये 5000 मर्यादेत प्रोत्साहन पर अनुदान जमा करता येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी सातबारा किंवा आठ अ चा दाखला आधार कार्डचा स्वयंशाक्षांकित प्रत आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ कोणत्याही प्रवर्गातील शेतकरी महिलांना लागू राहील. योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांचे वय मर्यादा 18 ते 65 पर्यंत असणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्ती किंवा अर्जदार स्वतः शासकीय निमशासकीय सेवेत नसावी. विधवा असल्याचा दाखला यासाठी नवऱ्याच्या मृत्यू नोंद दाखल्यासोबत पुनर्विवाह न केल्याचे स्वयंघोषणापत्र देण्यात यावे. परीतक्त्या किंवा घटस्फोटीत असल्यास यासाठी माननीय न्यायालयाचे अथवा सक्षम प्राधिकार्याचे आदेशासोबत नवऱ्याने सोडल्याचे किंवा नवऱ्यास सोडल्याचे स्वयंघोषणा पत्र देण्यात यावे. शिवाय आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकित प्रत चालू खाते आवश्यक आहे.
कुठे अर्ज कराल
वरील योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत पंचायत समिती कार्यालय व जिल्हा परिषद संकेतस्थळावर उपलब्ध आहेत व अर्ज भरून पंचायत समिती कार्यालयात जमा करायचे आहेत.
वरील सर्व योजना अंतर्गत पुरवण्यात येणारे साहित्य हे लाभार्थ्यांनी प्रथम स्वखर्चाने घेण्याचा आहे परंतु असे साहित्य घेण्यापूर्वी अर्जदाराने केलेल्या अर्जाची पात्रता तपासून प्रथम हेतु पत्र दिले जाईल व अशा हेतू पत्रात विहित केलेल्या मुदतीत खरेदी समितीने निश्चित केलेल्या मापदंडाचे साहित्य लाभार्थ्याने स्वतः खरेदी करून त्याच्या पुराव्याचा दाखला जीएसटी धारक पुरवठा दाराकडील विक्री पावत्या सादर करणे बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे असे खरेदी केलेल्या साहित्याची गुणवत्ता जिल्हा परिषदे कडून निश्चित केलेल्या कार्यपद्धतीने तपासली जाईल व साहित्य विहित गुणवत्ते बरहुकूम आहे असे दिसून आल्यास विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पात्र अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल यासाठी सर्व लाभार्थ्यांनी अतिरिक्त कागदपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.