किडीच्या हल्ल्यामुळे सुपारीची लागवड धोक्यात, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले 10 कोटींचे अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकात सुपारीच्या झाडांवर हल्ला करणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 10 कोटी रुपयांची अनुदानाची रक्कम जारी केली आहे. खरेतर, मेलीबग्स, स्केल आणि स्पायडर माइट्स यांसारखे कीटक कर्नाटकातील सुपारी झाडांवर हल्ला करत आहेत.त्यामुळे सुपारीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. यामुळेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांची रक्कम जारी केली आहे, जेणेकरून शेतकरी सुपारी झाडांवर कीटकनाशक रसायनांची फवारणी करू शकतील.

कृषी शास्त्रज्ञांच्या मते, सुपारीचे नुकसान करणारे सर्वात सामान्य कीटक म्हणजे मेलीबग्स, स्केल आणि स्पायडर माइट्स. ते देठ आणि पानांचा रस शोषून झाडाला डाग लावतात. याची तात्काळ काळजी न घेतल्यास सुपारीची पाने पिवळी पडतात आणि हळूहळू झाड सुकते. विशेष बाब म्हणजे जारी करण्यात आलेली रक्कम चिकमंगळूर, शिवमोग्गा आणि मलनाड जिल्ह्यांतील कीटकांच्या हल्ल्याविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी वापरली जाईल.
रविवारी हरिहरपुरा हेलिपॅडवर पोहोचल्यावर बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारने कीटकांचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाचे पथक पाठवले आहे.

प्रसार नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना 

ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या तज्ज्ञांच्या पथकाने चिकमंगळूरमध्ये यापूर्वीच अभ्यास केला आहे कारण पाऊस आणि वाऱ्यामुळे कीटक एका झाडापासून झाडावर पसरत आहेत. या प्रकरणात, बुरशी काढून टाकण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी केली जाईल. शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्व शिफारशींचे सरकार पालन करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

सरकार योग्य ती कारवाई करेल

यापूर्वी 15 नोव्हेंबर रोजी बसवराज बोम्मई यांनी सांगितले होते की, राज्य सरकार व्यावसायिक पिकांमधील कीटकांच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार आहे आणि त्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. सीएम बोम्मई यांच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले इनपुट अनुदान दुप्पट केले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, मलनाड प्रदेशातील सुपारीवर एका विशिष्ट कीटकाने हल्ला केला आहे आणि केंद्र सरकार आणि संबंधित संस्था या किडीवर उपाय शोधण्यासाठी काम करत आहेत. कृषी शास्त्रज्ञांनी या समस्येचे मूळ शोधून काढल्यानंतर सरकार योग्य ती कारवाई करेल, असे भाजप नेते म्हणाले.

error: Content is protected !!