जैविक कीटकनाशक ‘हिंगणास्त्र’ ; टोमॅटो ,मिरची ,भेंडी ,हरभऱ्यासह बऱ्याच पिकांच्या किडींवर प्रभावी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगणास्त्र हे एक जैविक कीटकनाशक आहे. हे जैविक कीटकनाशक काळा मावा, पिवळा मावा, हिरवा मावा, थिप्स, तुडतुडे, पांढरी माशी, रस शोषन करनारे सर्व रोग कीटक, मिरची वरील बोकड्या व्हायरस, टोमॅटो वरील लीफ व्हायरस, भेंडी वांग्यावरील शेंडे अळी , लाल कोळी, नाग अळी, मक्यावरील लष्करअळी, हरभर्यावरील व तुरी वरील घाटे, अळी फळ पोखरनारी अळी, कपाशीवरील गुलाबी बोंड अळी या सर्व कीडींचा विनाश होतो. पिकावरील सर्वच रोग आणि समस्या दुर होतील. शेतकर्याच नुकसानीपासुन बचाव होईल. आणि कीटक नियंत्रण होण्यास शेतकरी मित्रांना खूप मदत होईल. हा फार्मूला माझे जैविक शेती करणारे मित्र गणीभाई सय्यद यांचा आहे. मी स्वतः हिंगणास्त्राचा वापर केला मला चांगला रिझल्ट आला. शेतकऱ्यांनी याचा वापर करावा.

कृती

— पाच लीटर देशी गाईचे ताजे ताक घ्या
— त्यामधे एक कीलो हिंग घाला
–कमीत कमी पाच तास भिजत ठेवा.
–नंतर हे मिश्रण पूर्ण गाळून घ्या.
–तसेच गाळलेले हे द्रावण दोनशे लीटर पाण्यात टाका.
–नंतरच फवारणी करा.

एकरी प्रमाण:- सर्व पिकांसाठी एकरी एक कीलो हिंगणास्त्र लागते.

टिप :– देशी गाईचे ताजे ताक 200मिली घेऊन त्यामध्ये 85 ग्रॅम हिंगणास्र पाच तास भिजवुन ठेवावे. नंतर गाळुन फवारले तर हिंगणास्राची पावर पाच पटीने वाढते. सोबतच एक किलो हिंगणास्रा मध्ये 5 लिटर देशी गाईचे ताजे ताक घ्यायला विसरू नका.नंतर पाच तास भिजवुन ठेवणे.व गाळुन फवारले तर हिंगणास्राची पावर पाच पटीने वाढते.

या किडींवर प्रभावी

शेतकरी मित्रहो, मावा-तुडतुडे-फुलकिडे-पांढरी माशी-रशशोषक करणारी कीड, थ्रीप्स, घाटे अळी, लष्कर अळी,सर्व प्रकारची अळीसाठी आणि मुख्य बोंडअळी , खोड अळीसाठी हिंगणास्र प्रभावी आहे.

जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८

Leave a Comment

error: Content is protected !!