Black Guava : काळ्या पेरुबाबत कधी ऐकलंय का? पहा कुठे केली जाते लागवड अन उत्पन्न किती मिळतं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात काही वर्षांपासून पेरुंची लागवड केली जाते. आपण काळ्या रंगाचे टोमॅटो ऐकलं असेल, कडकनाथची काळी कोंबडी, काळे तांदूळ यानंतर आता बाजारात काळे पेरू आले आहेत. सध्या काळ्या पेरूला बाजारात चांगली मागणी असून त्याला दरही मिळतो आहे. काळ्या रंगाच्या पेरूमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्ण असल्याने बाहेरील देशांतसुद्धा त्याची मागणी आहे. आज आपण काळ्या पेरूची लागवड कुठे केली जाते अन त्यातून किती उत्पन्न मिळते याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

पेरूच्या लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालू शकते. मात्र चिकन माती असेल तर पेरू लागवडीसाठी अधिक फायदेशीर ठरते. या काळया पेरूची लागवड उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अधिक होते. या पेरूचे वैशिष्ट म्हणजे या पेरूचा बाहेरून काळा रंग असून आतून पेरूचा गाभा लालभडक असतो. एका फळाचे वजन हे १०० कि. ग्रॅम किंवा त्याहून अधिक असते.

काळ्या पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात. याचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. थंडीचा हंगामात या पेरूची वाढ होऊ लागते. याचा फायदा हा फळ चाखणारे आणि उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना होतो. यात औषधी गुणधर्म असून काळ्या पेरूवर किडींचे प्रमाण कमी झाले आहे. काळ्या पेरूची लागवड करण्यापूर्वी त्या मातीचे परीक्षण करणे आवश्यक असते. पेरूची लागवड केल्यानंतर ३ वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होते. परिपूर्ण फळ पिकल्यानंतर पेरू झाडावरून उतरावे.

शेतकरी बांधवांना काळ्या पेरूची लागवड करायची असेल, तर बागेत शेणखत आणि गांडूळ खताचाच वापर करावा जेणेकरून उत्पन्न वाढीस हातभार लागतो. एका हेक्टमधून लागवड केल्यास लाखो रुपयांचा नफा मिळतो. मात्र सध्या हे फळ मार्केटमध्ये नवीन असल्याने त्याला मागणी आहे. तुम्ही लागवड करण्याचा विचार करत असाल तर प्रथम याची खात्री करा कि त्याला पुढील अनेक वर्ष मागणी राहील का. अनेकदा आपण घाईगडबडीत निर्णय घेतो अन त्याचा मोठा आर्थिक फटका आपल्याला बसतो.

error: Content is protected !!