काळया टोमॅटोची शेती कधी ऐकली का? देशातील ‘या’ ठिकाणी होतेय लागवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. बऱ्याचदा एखाद्या फळाचा रंग हा ठराविक मानला जातो. जसे की, टोमॅटोचा रंग हा लाल असतो. टोमॅटोचा लाल रंग असणे हे फारच सर्वसामान्य बाब आहे. मात्र काळे टोमॅटो कधी ऐकलं का? कदाचित नसेल ऐकलं पण काळया रंगाचे देखील टोमॅटो असतात. या टोमॅटोमधून के, सी, ए हे जीवनसत्त्व असते. यामुळे हे टोमॅटो आहारात असावे. तसेच ब्युटी प्रॉडक्टसाठी देखील त्याचा फायदा होतो.

काळया टोमॅटोची शेती ही इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. याला इंडिगो रोज टोमॅटो नावाने ओळखले जाते. यालाच युरोपमध्ये सुपरफुड असे देखील म्हणत आहेत. तसेच या काळया टोमॅटोसाठी उष्ण वायूची आवश्यकता असते. काळया टोमॅटोसाठी हे उष्ण वायू वातावरण पोषक वातावरण असल्याचं समजतंय. भारतात बरेच ठिकाणी उष्ण वायू असलेलं वातावरण पहायला मिळतंय. यामुळे लाल टोमॅटोहून काळया टोमॅटोला अधिक मागणी आहे. देशातील हिमाचल प्रदेश या ठिकाणी याची लागवड केली जाते.

हिमाचल प्रदेशात काळया टोमॅटोची लागवड :

सर्वात आधी टोमॅटोची शेती ही इंग्लंड या देशात केली जात होती. इंडिगो रोज टोमॅटो नावाने इंग्लंडमध्ये ओळखले जात असून युरोपमध्ये याला सुपरफूड असे देखील म्हणातात. मात्र आता याच काळया टोमॅटोची लागवड ही भारतातील हिमाचल प्रदेशात केली जात आहे. यासाठी विदेशातून काळया टोमॅटोचे बीज मागवण्यात आले आहे. यानंतर टोमॅटोची लागवड केली गेली. या लागवडीबाबत पुढीलप्रमाणे माहिती नमूद करण्यात आली आहे.

जानेवारी हा महिना लागवडीसाठी उत्तम

काळया टोमॅटोची लागवड करण्यासाठी जानेवारी हा महिना फार महत्वपूर्ण आहे. याची लागवड केल्यानंतर तीन महिने झाले की टोमॅटो येऊ लागतात. त्यानंतर अंदाजे एप्रिलपर्यंत लागवड करता येऊ शकते. एक हेक्टर एवढं जरी उत्पादन मिळवलं तरीही चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. यामुळे आता लाल टोमॅटोहून काळया टोमॅटोची किंमत ही अधिक असून भाव १०० ते १५० रुपये किलो दर मिळतो.

error: Content is protected !!