पिकविमा अग्रीम व निराधारांच्या विविध मागण्यांसाठी पाथरीत रास्ता रोको; महिलांचा लक्षणीय सहभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळातील शेतकऱ्यांना खरिपातील पाऊस खंडामुळे झालेल्या नुकसानीपोटी पिकविमा अग्रीम ,यासह निराधार महिलांच्या विविध मागण्यांसाठा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील सेलू कॉर्नर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले .

जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न व निराधार महिलांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ते सेलू कॉर्नर पर्यंत मोर्चा काढून कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा वतीने शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीडच्या दरम्यान दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांची समजूत घालण्यासाठी यावेळी पाथरीच्या तहसीलदार सुमन मोरे यांनी आंदोलकांची भेट घेत या ठिकाणी त्यांच्या मागण्यांची निवेदन स्वीकारले.

यावेळी दिलेल्या प्रशासनास निवेदनात म्हटले आहे की, पावसाच्या खंडामुळे तसेच अवेळी पावसामुळे शेतकरी हातचे आलेले पीक गमावून बसले आहेत सोयाबीन , कापूस , मूग , तूर , पावसा आभावी जळून गेले आहेत त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे कधीही भरून निघणारे नुकसान झाले आहे . पाथरी तालुका पिक विमा 25 टक्के अग्रीम विम्यातून वगळले आहे . सर्व जिल्हांना अग्रीम दिला परंतु त्यामधूनही परभणी जिल्हा वगळला आहे . पिक विम्याच्या माध्यमातून शेतकर्‍याला मिळणारा आधारही काढून घेण्याचं काम मायबाप सरकारने केले आहे . याशिवाय मराठवाड्यात परभणी आणि बीड वगळता सर्व जिल्ह्याला अतिवृष्टी अनुदान देण्यात आले.

असे निवेदनात नमुद करत हेतूपूर्वक परभणी जिल्हा आणि त्यामधील पाथरी तालुका पूर्णतः वगळण्याचे षडयंत्र राजकारण्यांनी केले आहे असा आरोप यावेळी करण्यात आला आहे .

यावेळी आंदोलकांनी अतिवृष्टीग्रस्त अनुदान संपूर्ण पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावे , पावसाच्या विलंबामुळे सोयाबीन कापूस हातचे गेले आहे त्यामुळे 25 % विमा अग्रीम रक्कम विमा कंपनीने त्वरित द्यावी , श्रावणबाळ संजय गांधी निराधार , इंदिरा गांधी निराधार लाभधारकांना गेली सहा महिने झाले मानधन दिले नाही ते त्वरित देण्यात यावे , संजय गांधी निराधार , श्रावण बाळ योजना , इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हेतूपूर्वक डावलण्यात आलेले अर्ज तात्काळ निकाली काडून त्यांना मानधन चालू करावे , मंजरथ येथील मानव विकास अंतर्गत बस सेवा तात्काळ सुरू करावी , नायब तहसीलदार यांना निलंबित करावे , सर्व बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करावा , ऊस लागवडीच्या नोंदी तात्काळ घेण्यात याव्यात ,रेणुका शुगर्स कारखान्याने 86032 या जातीच्या उसाची लागवड सक्तीची करणे तात्काळ बंद करावे , सेलु रस्ता तात्काळ दुरुस्ती करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

रास्तारोको आंदोलनात कॉ .सुधीर कोल्हे कॉ . ज्ञानेश्वर काळे कॉ . तुकाराम शिंदे कॉ . लिंबाजी शिंदे कॉ . बळीराम तोंडे कॉ.नारायण दळ वे कॉ . मुंजाभाऊ लिपणे कॉ . शरद झुटे कॉ . अनिता दुपडे , कॉ . श्रीनिवास वाकणकर कॉ . शेख बडेसाब कॉ . अनिस शेख कॉ . ज्ञानेश्वर कॉ . सचिन काळे कॉ . गणेश नखाते यांच्यासह शेतकरी व निराधार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

error: Content is protected !!