Bogus Cotton Seeds : प्रतिबंधित बोगस बीटी बियाणे जप्त; यवतमाळमध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई!

0
3
Bogus Cotton Seeds Yavatmal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रतिबंधित बियाणे विक्री प्रकरणी (Bogus Cotton Seeds) यवतमाळच्या कृषी विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात प्रतिबंधित बोगस बीटी बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रावर छापा घालून हा सर्व प्रकार उजेडात आला आहे. या कारवाईत 35 हजार रुपयांचे 23 बीटी बियाणे पाकीटसह 1 लाख 46 हजारांचा मुद्देमाल (Bogus Cotton Seeds) कृषी विभागाच्या वतीने जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

दोघांवर गुन्हा दाखल (Bogus Cotton Seeds Yavatmal)

यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामनी ते पांढरकवडा रोडवर पंचायत समिती वसाहतीसमोर असलेल्या केंद्रावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी एक विधिसंघर्ष बालकासह संकल्प राजेश भोयर (वय 20 वर्ष) या दोघांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सध्या सुरू आहे. खरीप हंगाम तोंडावर आला कि शेतकरी पेरणीच्या तयारीला लागत असतात. अशातच राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट असल्याचे देखील बघायला मिळत आहे.

कृषी विभाग सतर्क

या बोगस बियाणांच्या विक्री प्रकरणी कृषी विभाग सतर्क झाले असून, अशा बोगस आणि प्रतिबंधित बियाणे विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवून असते. अशातच विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या झरीजामनी तालुक्यात प्रतिबंधित असलेले अनाधिकृत बीटी बियाण्यांची विक्री होत असल्याची गोपीनिय माहिती कृषी विभागाला मिळाली होती.

1 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त

या माहितीच्या आधारे कृषी विभागाचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने साफळा रचत कारवाई केली. यात सुमारे 35 हजार रुपयांचे 23 बीटी बियाणे पाकीटसह 1 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, जिल्ह्यात अजून काही प्रतिबंधित आणि बोगस बियाणे विक्री केल्या जात आहे का? याचाही तपास घेतला जात आहे.