Boron Deficiency In Papaya: पपई पिकात बोरॉनच्या कमतरतेमुळे उत्पादनात होऊ शकते घट; जाणून घ्या लक्षणे आणि व्यवस्थापन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पपई पिकामध्ये बोरॉनच्या कमतरतेमुळे (Boron Deficiency In Papaya) फुले व फळे तयार होण्यास अडथळा येतो. फुले फार लवकर कोमेजतात, ज्यामुळे फळांच्या उत्पादनात (Papaya Production) लक्षणीय घट होते. अशा परिस्थितीत, काही व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून उत्पादक बोरॉनच्या कमतरतेचे (Boron Deficiency In Papaya) दुष्परिणाम रोखता किंवा कमी करता येतात.

बोरॉन (B) हे पपई लागवडीतील एक महत्त्वाचे सूक्ष्म अन्नघटक (Micronutrient) आहे. कारण ते पेशींची निर्मिती आणि पुनरुत्पादन प्रक्रियांमध्ये (Reproduction Process) महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पपईमध्ये बोरॉनच्या कमतरतेमुळे पपईमध्ये विविध लक्षणे दिसू शकतात, ज्यामुळे पिकाच्या एकूण आरोग्यावर आणि फळ उत्पादनावर वाईट परिणाम होतो. जाणून घेऊ या बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे (Boron Deficiency In Papaya) पपई पिकात दिसणारी विविध लक्षणे आणि त्यावरील व्यवस्थापन.

पपई पिकामध्ये बोरॉनच्या कमतरतेची मुख्य लक्षणे (Boron Deficiency Symptoms)

विकृत पाने: पपईमध्ये बोरॉनच्या कमतरतेच्या (Boron Deficiency In Papaya) सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे कोवळी पाने विकृत होणे हे आहे. झाडाची पाने ठिसूळ होऊन वर किंवा खालच्या दिशेने गुंडाळले जातात.  पानांच्या शिरा जाड होतात. पानांचा आकार लहान होतो, ज्यामुळे पाने कडक आणि विकृत दिसू शकतात.

पानांच्या शिराजवळचा भाग पिवळा पडणे: बोरॉनच्या कमतरतेमुळे पपईच्या (Boron Deficiency In Papaya) पानांमध्ये इंटरवेनल क्लोरोसिस (Papaya Leaf Yellowing) यासारखी लक्षणे दिसतात. यामुळे पानांवर डाग पडतात किंवा ती पिवळी दिसतात. विशेषतः कोवळ्या पानांवर ही लक्षणे दिसतात.

झाडाची वाढ खुंटते: प्रादुर्भावीत झाडात पेशींचे विभाजन कमी झाल्यामुळे झाडांची वाढ खुंटते. कोंबाची वाढ होत नाही किंवा त्याची मर होते, ज्यामुळे झाडाची एकूण उंची आणि जोम कमी होतो.

फुले आणि फळांची वाढ होत नाही: पपईमध्ये बोरॉनच्या कमतरतेमुळे (Boron Deficiency In Papaya) फुले आणि फळांचा (Flower And Fruit Development) विकास थांबतो. फुले अकाली कोमेजतात, ज्यामुळे फळांच्या उत्पादनात लक्षणीय घट होते. याव्यतिरिक्त, जे फळ तयार होतात ते विकृत असू शकतात, फळांना तडे जाऊ शकतात ज्यामुळे त्यांची गुणवत्ता ढासळून ते विक्रीयोग्य राहत नाही.

मुख्य खोड तडकणे: बोरॉनची कमतरता असलेल्या पपईच्या झाडांमध्ये अनेकदा मुख्य खोडामध्ये भेगा किंवा फूट दिसून येते, जे मुख्यता चिक गळण्यामुळे होऊ शकते.  यामुळे झाडे कमकुवत होतात आणि रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भावास अधिक बळी पडतात.

पपई पिकात बोरॉनची कमतरता भरून काढण्याचे उपाय (Boron Deficiency Management)

पपईतील बोरॉनच्या कमतरतेच्या (Boron Deficiency In Papaya) व्यवस्थापनासाठी माती आणि पानांवर फवारणी तसेच माती आणि पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

माती सुधारणा: पपईमध्ये बोरॉनची कमतरता दूर करण्यासाठी, बोरॅक्स (सोडियम बोरेट) किंवा सोल्युबर (सोडियम पेंटाबोरेट) सारखी बोरॉनयुक्त खते जमिनीतून देता येऊ शकतात. कमतरतेच्या तीव्रतेनुसार आणि मातीच्या प्रकारानुसार शिफारशीप्रमाणे साधारणतः 1-2 किलो बोरॅक्स प्रति हेक्टर डोस द्यावे. बोरॅक्स हे जास्त प्रमाणात जमिनीत घालू नये, कारण ते विषारी होऊ शकते.

पानांद्वारे फवारणी: बोरॉनच्या कमतरतेची लक्षणे लवकर भरून काढायची असल्यास पानांद्वारे फवारणी जास्त प्रभावी उपाय आहे. 0.2 ते 0.3% बोरॅक्स किंवा 0.1-0.2% सोल्युबरचे द्रावण झाडाची वाढ आणि पुनरुत्पादनाच्या अवस्थेत पानांवर फवारता येते. बोरॉनची पुरेशी पातळी राखण्यासाठी फुलधारणा आणि फळधारण अवस्थेत वारंवार फवारणी करणे गरजेचे असते.

माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन: बोरॉनची पातळी निश्चित करण्यासाठी आणि त्यानुसार खतांचा वापर समायोजित करण्यासाठी नियमितपणे माती परीक्षण करणे आवश्यक आहे. 7.0 (अल्कलाईन) पेक्षा जास्त सामू (pH) असलेल्या मातीत बोरॉनची उपलब्धता कमी होते, त्यामुळे सेंद्रिय पदार्थ किंवा सल्फर सुधारकाद्वारे मातीचे सामू नियंत्रित केल्यास मातीद्वारे बोरॉनचे चांगले शोषण होऊ शकते.

सेंद्रिय कर्ब वाढवणे: जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढल्याने बोरॉनची उपलब्धता वाढते. कंपोस्ट आणि चांगले कुजलेले खत केवळ बोरॉनचा पुरवठा करत नाही तर मातीची रचना, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पोषक द्रव्ये टिकवून ठेवतात. जे पपईच्या झाडाद्वारे चांगल्या प्रकारे शोषले जातात.

पाणी व्यवस्थापन: जास्त सामू (पीएच) किंवा कार्बोनेटयुक्त सिंचन पाणी बोरॉनची उपलब्धता कमी करू शकते. संतुलित मात्रात खनिज असलेल्या पाण्याचा वापर करून योग्य पाणी व्यवस्थापन करणे, झाडाजवळ अतिरिक्त पाणी साचणे किंवा पाण्याचा ताण टाळणे या उपायामुळे बोरॉन शोषण्यास मदत होऊ शकते. याव्यतिरिक्त, ठिबक सिंचनमुळे, मातीत योग्य प्रमाणात आर्द्रता राखण्यास मदत होते.

संतुलित खत: बोरॉनच्या कमतरतेसह इतर पोषक तत्वांचे, विशेषतः कॅल्शियम आणि पोटॅशियमचे असंतुलन होते. यासाठी झाडाला संतुलित खत दिले पाहिजे, ज्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांसह नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारख्या प्रमुख पोषक घटकांचा समावेश आहे, संपूर्ण झाडाच्या आरोग्यासाठी आणि वाढीस चालना देण्यासाठी हे आवश्यक आहे

वरील व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी करून, पपई उत्पादक बोरॉनच्या कमतरतेचे (Boron Deficiency In Papaya) परिणाम टाळू शकतात आणि कमी करू शकतात, निरोगी रोपांची वाढ, फुल आणि फळांचा योग्य विकास आणि उच्च उत्पादन सुनिश्चित करू शकतात. पपई लागवडीमध्ये बोरॉनचे प्रमाण पुरेसे राखण्यासाठी पिकाचे नियमित निरीक्षण आणि वेळेवर नियोजन महत्त्वाचे आहे.

error: Content is protected !!