Bovine Pregnancy Test Kit : गाई, म्हैस गाभण राहिलीय कि नाही हे आता फक्त 10 रुपयात समजणार; कसं ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Bovine Pregnancy Test Kit) : राज्यात आणि देशात अनेकजण जनावरे पालक आहेत. एवढंच नाही तर, मानव जातीत ज्या पद्धतीने महिला आपल्या बाळाला जन्म देतात त्याच प्रमाणे गायी आणि म्हशी या आपल्या बाळाला (जनावराला) जन्म देतात. मात्र या गायी, म्हशी बऱ्याचदा गर्भवती म्हणजेच माजावर आली की नाही हे पशुपालकांना वेळेवर कळत नाही. मात्र आता आपलं जनावर गाभण राहिलंय कि नाही हे आता केवळ १० रुपयांत समजणार आहे.

बऱ्याचदा जनावर माजावर आले की नाही हे कळत नाही. जर जनावर गाभण आहे कि नाही हे शेतकऱ्याला वेळेवर समजले तर उपाययोना करून त्याला आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. जोपर्यंत गायी किंवा म्हैस पिल्लाला जन्म देत नाही तोवर ती दूध देत नाही. यामुळे पशुपालकांचा मेहनती खर्च वाया जातो. ग्रामीण भागात जनावराची गर्भधारणा तपासणी सुमारे ३ ते ४ महिन्यांनी केली जाते, जी पशुपालकांसाठी नुकसानकारक असते. जर जनावर गाभण राहिले नसेल तर वेळीच त्यावर उपाययोजना करून नुकसान टाळणे आता शक्य झाले आहे. Bovine Pregnancy Test Kit

म्हैस किंवा गायी गाभण का ते १० रुपयात कसे तपासायचे?

केंद्रीय म्हैस संशोधन संस्था, हिसार (सीआयआरबी) आणि भारत सरकारच्या बायोटेक्नोलॉजी विभागाने ‘प्रेग डी कीट’ तयार केले आहे. या किटच्या मदतीने आता पशुपालकाला आपले जनावर गाभण राहिले की नाही, हे समजणार आहे. या दहा रुपयांच्या किटद्वारे शेतकरी गर्भधारणा तपासणी करू शकतात. शेती निगडित अशा प्रकारचे कोणतंही साहित्य विकत घेण्यासाठी हॅलो कृषी मोबाईल अँप सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करून अँप आजच डाउनलोड करून घ्या.

error: Content is protected !!