हॅलो कृषी ऑनलाईन: काही दिवसांपूर्वी (Bullock Pair For Farmer) सोशल मिडियावर एक बातमी वेगाने वायरल होत होती की एका शेतकऱ्याने शेतात कोळपे वापरून सरी काढण्यासाठी बैलजोडी नाही म्हणून भावाला व आपल्या मुलाला कोळप्याला जुंपले आहे. या बातमीची कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दखल घेतली असून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बालाजी पुंडगे यांना आज त्यांच्या बांधावर बैलजोडी (Bullock Pair For Farmer) भेट पाठवली आहे.
हिंगोली (Hingoli District) जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे (Balaji Pundage) या शेतकर्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीसाठी बैलजोडी घेणे (Bullock Pair For Farmer) परवडत नाही आणि ऐन वेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाई गडबडीत सरी काढण्यासाठी शेतकर्याने स्वत:च्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्याच्या संदर्भात विविध प्रसिद्धी माध्यमांनी हे वृत्त देण्यात आले.
वृत्ताची दखल घेत मंत्री श्री. मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील सहकारी यांच्या मदतीने या शेतकर्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर आज श्री. मुंडे यांच्या वतीने बी. डी. बांगर हे थेट बैलजोडी (Bullock Pair For Farmer) घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले. पुंडगे परिवाराच्या आनंदाला यावेळी सीमा उरली नव्हती.
दरम्यान मंत्री श्री. मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला, यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैल जोडी पाठवत असून शेतातील कामांसाठी आपण कृषी विभागाकडे (Agriculture Department) संबंधित योजनेतून ट्रॅक्टरसाठी (Tractor Scheme) देखील अर्ज करावा, असे बालाजी पुंडगे यांना म्हटले. तर बालाजी पुंडगे यांनी सुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्ये सुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा (Bullock Pair For Farmer) सांभाळ करू; असा शब्द धनंजय मुंडे यांना दिला. यावेळी बी.डी.बांगर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी हे शिरळे गावात उपस्थित होते.