Business Idea : ‘या’ 3 पक्ष्यांचे पालन कराल तर काही दिवसांतच व्हाल मालामाल; बंपर कमाईची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीला जोडधंदा (Business Idea) केला तर शेतकरी अधिक नफा कमाऊ शकतो. सध्या अनेक शेतकऱ्यांकडे कमी शेतजमीन असल्याने फक्त शेतीवर अवलंबून राहणे कठीण जाते. अशावेळी शेतकरी काहीतरी जोडधंदा शोधतात. कोणी ट्रॅक्टर, रोटावेटर घेऊन इतरांच्या शेतात मशागतीची कामे करतात तर कोणी गाई म्हशी, पक्षी पालन करून त्यातून अधीक पैसे कमवतात. महाराष्ट्राचा विचार केला तर इथे कुकुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र मुकुट पालनासोबत अजून कोणत्या पक्षांचे पालन केल्यास नफा मिळू शकतो याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

नवीन व्यवसायासाठी सरकारी अनुदान मिळवायचे असेल तर हे काम आजच करा –

शेतकरी मित्रांनो नवीन व्यवसाय सुरु करायचा म्हटलं कि सर्वात अगोदर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पैशांचा. मात्र आता तुम्ही याबाबत निश्चिन्त राहू शकता. कारण गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने तम्ही शासनाच्या कोणत्याही योजनेकरिता सहज अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही वेळ अंडी पैसे घालवावे लागत नाहीत. तुमच्या मोबाईलवरून सरकारच्या कोणत्याही योज़नेला सहज अर्ज करून लाभ घेण्यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करते. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा आणि लाभार्थी व्हा.

कुकुटपालन

ग्रामीण भागात सर्रास शेतीला जोडधंदा म्हणून कुकुटपालन केले जाते. परंतु काही शेतकरी सोडले तर इतर शेतकरी कुकूटपालनाला व्यावसायिक दिशा देण्यात कमी पडतात. आज गावरान कोंबडा कोंबडी मिळणे कठीण झाले आहे. तसेच गावरान अंडी मिळणेही शहरात मुश्किल आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जर गावरान कोंबड्यांचे पालन करून त्याला योग्य ववसायिक दिशा दिली तर नक्कीच यातून बक्कळ कमाई करता येऊ शकते. तुम्ही Hello Krushi मोबाईल अँपवरून तुमच्या कोंबड्या अतिशय चांगल्या दरात थेट ग्राहकाला विकू शकता.

कुकुटपालन करताना आपल्या कोंबड्या कोणत्याही रोगाला बळी पडणार नाहीत याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. याशिवाय त्या कोंबड्यांचे साप, विंचू, कुत्रे, मांजर इत्यादींपासूनही संरक्षण करावे लागते. कुक्कुटपालनासाठी तुम्ही विविध बँकांकडून कर्ज देखील मिळवू शकता. पोल्ट्री फार्मसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनही कर्ज घेता येते. यासाठी तुम्हाला मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड आणि इतर अनेक कागदपत्रांची आवश्यकता आहे.

बदकांची शेती

बदकांची अंडी आणि मांस या दोन्हीमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून येते. बाजारपेठेतही त्याची मागणी वाढत आहे. मागणीसोबतच त्याचे भावही वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होत आहे. बदक पालन सुरू करण्यासाठी शांत जागा उत्तम मानली जाते. तलावाच्या सभोवतालची जागा यासाठी अतिशय योग्य असल्याचे समजले जाते. परंतु बदक शेतीसाठी मोठा तलाव सायलाच हवा असे नाही. आजकाल अनेक शेतकरी शेततळ्यावरही बदक पळून चांगले पैसे कमावत आहेत.

बदक फार्म सुरू करण्यासाठी सरकारकडून 25 टक्के अनुदानही दिले जाते. दुसरीकडे, एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्तींसाठी अनुदानाची रक्कम 35 टक्के निश्चित करण्यात आली आहे. नाबार्ड (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) सुद्धा बदक पालनासाठी शेतकऱ्यांना कर्ज देते. याशिवाय, प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत एसबीआय कडून बदक पालनासाठी कर्ज दिले जाते. अनेक हॉटेलमध्ये बदक खाद्य पदार्थासाठी वापरले जातात. तुम्ही तुमच्याकडील बदक Hello Krushi अँपच्या मदतीने थेट हॉटेल मालकांना विकून चांगला नफा कमाऊ शकता.

बदकाची वैशिष्ट्ये –

  • एका गावातून दुसऱ्या गावात जिथे जाण्याची उपलब्धता असते तिथे जातात.
  • रात्रीच्या वेळी बदके शेतात एका ठिकाणी ठेवतात आणि सकाळी अंडी गोळा करतात.
  • शिवाय रात्रभर शेतात बसवल्याबद्दल (मूत्र खत यांच्या मोबदल्यात) शेतकऱ्यांकडून पैसेही घेतात.
  • बदकं कोंबड्यांपेक्षा जास्त काटक असतात.
  • कोंबड्यांपेक्षा वाढही जलद होते.
  • अंडी मोठी असून ते देण्याचं प्रमाणही जास्त असते.
  • खाद्यावरचा खर्च कोंबडीच्या तुलनेत निम्माच असतो.
  • बदकाच्या घर व्यवस्थापनासाठी जास्त खर्च येत नाही.
  • कोंबडीच्या तुलनेत बदकांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही.
  • बदके रात्रीच्या वेळी अंडी देतात. श्यक्यतो १००% बदके रात्री ते सकाळी ९ वाजेपर्यंत अंडी घालतात आणि त्यानंतर त्यांना चरायला सोडता येतं.

बदक पालनाचे फायदे –

  • बदकामध्ये रोग प्रतिकार शक्ती जास्त असते त्यामुळे रोगराईचं प्रमाण कमी असतं.
  • बदक कळपात राहत असल्याने त्यांची संरक्षण मॅनेजमेंट सोयीची असते.
  • १००% बदकं रात्री ते सकाळी ९ पर्यंत अंडी घालतात. त्यामुळे सर्वच्या सर्व अंडी पदरात पडतात.
  • बदके चरायला सोडल्यानंतर स्वतःचे अन्न स्वतः शोधतात. चरणं झाल्यानंतर रात्री मूळ जागेवर येण्याची त्यांना तंतोतंतपणे सवय लावता येते.
  • दलदलीच्या रेताड पाणथळ जागेवर बदकपालन करता येते.
  • देखभालीवराचा खर्च कमी.
  • अंडी मोठी असून पौष्टिक असतात.

तीतर शेती

तितराची शेती करायची असेल तर त्यासाठी सरकारकडून परवाना घ्यावा लागेल. मादी तितराची वर्षभरात 300 अंडी घालण्याची क्षमता असते. बहुतेक तितर त्यांच्या जन्माच्या ४५ ते ५० दिवसांत अंडी घालू लागतात. त्याचा व्यवसाय फार कमी वेळात सुरू करता येतो. तितर शेतकऱ्यालाही बंपर नफा मिळवून देतो. या पक्ष्यांचा आकार लहान व वजन कमी असल्याने अन्न व जागेची गरजही कमी असते. तितर व्यवसायातील गुंतवणूकही खूपच कमी असते. केवळ 4-5 तितरांचे संगोपन करून त्याचा व्यवसाय सुरू करता येतो.

error: Content is protected !!