Buy sand online : सध्या वाळूच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आला असून वाळूची विक्री ही राज्य सरकार मार्फत होणार आहे. सध्या वाळूचे दर देखील खूप वाढले आहे त्याचबरोबर वाळूची तस्करी होण्याचे प्रमाण देखील मोठे वाढले आहे अनेक लोक अवैधरित्या वाळू धंदा करतात आणि सर्वसामान्यांना विलून सर्वसामान्यांची लूट करतात हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने ऑनलाईन वाळू विक्रीचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांना अगदी स्वस्थ दरामध्ये वाळू उपलब्ध होणार आहे.
जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
याच गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने आता जवळपास 65 वाळू डेपो तयार केले आहेत. ज्यांना कुणाला वाळू खरेदी करायची असेल त्या लोकांना आता ऑनलाईन वाळू खरेदी करता येईल त्यासाठी तुम्हाला महा खनिज या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. या ठिकाणाहून तुम्ही वाळूची ऑनलाईन खरेदी करू शकता.
वाळूच्या वाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध
तुम्हाला जर वाळूची खरेदी करायची असेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या महा खनिज या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला किती वाळू घ्यायची आहे याबाबत नोंदणी करावी लागेल आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी ट्रक देखील राज्य सरकारने उपलब्ध करून दिले आहेत तुम्ही वाळूची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला घरपोच वाळू दिली जाईल.
कोणत्या जिल्ह्यात आहेत वाळू डेपो
पुणे जिल्ह्यामध्ये 18 वाळू डेपो आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये 35 आहेत त्याचबरोबर अमरावती मध्ये चार आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सात वाळू डेपो आहेत. अशाप्रकारे राज्यातील 36 तालुक्यांमध्ये 65 वाळू डेपो उभारण्यात आले आहेत . त्यामुळे तुम्हाला वाळू खरेदी करायची असेल तर तुम्ही राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन वाळू खरेदी करू शकता.
नागरिकांची लूट थांबणार
बऱ्याचदा सामान्य नागरिकांना घर बांधण्यासाठी जास्त वाळूची आवश्यकता असते. मात्र काही लोक अवैधरीत्या वाळू उपसा करतात आणि या नागरिकांना विकतात. यावेळी देखील नागरिकांची मोठी फसवणूक केली जाते ही वाळू नागरिकांना जास्त दराने उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो मात्र नागरिकांकडे कोणता पर्याय नसल्याने नागरिकांना ती वाळू घ्यावीच लागत होती मात्र. आता राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना ऑनलाइन वाळू मिळणार आहे.