शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; कोण होणार कृषी मंत्री ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी आज शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. ही प्रक्रिया आज सकाळी 11:00 वाजल्यापासून सुरू झाली असून राज्यपाल भगतसिंग कोशारी शिंदे गट भाजप युतीच्या आमदारांना शपथ देतील. भाजपचे ९ मंत्री तर शिंदे गटाचे ९ मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतील.

यावेळी जवळपास 20 जण मंत्री पदाची शपथ घेऊ शकतात अशी चर्चा आहे. या शपथविधी कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे.उत्सुकता आहे ती कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार याची. त्यातही मागच्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडूनही कृषी खातं दिलं गेलं नाही मांत्रिमंडळ विस्तार नाही. कृषी खात्याचा कार्यभार कुणाकडे नाही म्हणून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली जात होती. मात्र आता राज्यातलं ‘कृषी मंत्री’ पद हे कोणाकडे जाणार याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोणाला मिळणार कृषी खाते ?

दरम्यान यापूर्वी कृषी खातं हे दादा भुसे यांच्याकडे होतं मात्र या वेळेला कृषी खातं हे दादा भुसे यांच्याकडेच देणार की आणखी कोणी हा कार्यभार स्वीकारणार याबाबतची उत्सुकता आहे. काही का असेना मात्र सध्याची पाऊस परिस्थिती आणि पूर परिस्थिती बघता शेतकऱ्यांना कृषी मंत्र्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एकदा का मंत्रिमंडळ विस्तार झाला की कृषी खाते जोमाने कामाला लागेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!