जनावरांमध्ये देखील आहे कॅल्शिअम महत्वाचे; कमतरतेमुळे होतात वाढीवर परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो आपणास माहीतच असेल की कॅल्शिअम हा मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे आपल्या पशुधनासाठी देखील कॅल्शिअम हे महत्वाचे असते. जनावरांमध्ये कॅल्शिअमची कमतरता असेल तर जनावरांची वाढ खुंटते, दूध उत्पादन कमी होते, शरीरातील रक्त गोठण्यास वेळ लागतो. हाडे ठिसूळ होतात.स्नायूत अशक्तपणा येतो. लहान जनावरात मुडदूस आणि प्रौढ जनावरांत उरमोडीची लक्षणे दिसतात. चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. गाई आणि म्हशीमध्ये प्रजोत्पादनासंबंधी समस्या दिसतात. त्यामुळे वेळीच याकडे लाख देणे गरजेचे आहे.

जनावरांमध्ये कॅल्शिअमचे महत्व

जनावरांच्या शरीरातील अनेक शारीरिक आणि जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये कॅल्शिअमचा मोठ्या प्रमाणावर सहभाग करतो. यामध्ये रक्त जमा करणे, स्नायूंच्या उत्तेजना आणि आकुंचन यांचे जोडणे, मज्जातंतूंच्या उत्तेजिततेचे नियमन, शुक्राणूंची गतिशीलता, ओव्याचे फलन, पेशींचे पुनरुत्पादन यांचा समावेश होतो. कॅल्शिअम हे संदेशवाहकामध्ये महत्त्वाचे काम करते. सर्व स्नायू पेशींच्या आकुंचनमध्ये कॅल्शिअमची भूमिका महत्त्वाची असते.

जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण

जनावरांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण जवळ जवळ एक टक्के एवढे असते. शरीरातील ९९ टक्के कॅल्शिअम हाड व दातांमध्ये असते. कॅल्शिअम मऊ पेशीत व रक्तात साठवलेले असते. जनावरांच्या उत्पादन आणि आरोग्याच्या व्यवस्थापनात कॅल्शिअम हे महत्त्वाचे घटक आहे. पशू व्यवस्थापनात हिरवा पालेदार चारा मुख्यत्वे द्विदल चारा हा कॅल्शियमचा उत्तम स्तोत्र आहेत.

कॅल्शिअमचे कार्य

हाड व दातांची उत्तम वाढ होण्यासाठी, रक्त गोठवण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते. जनावरांच्या शरीरामध्ये पाण्याचे संतुलन करणे, ऑस्मॉटिक प्रेशर संतुलन करण्यासाठी उपयुक्त ठरते. मांस पेशी व मज्जा संस्थेवर नियंत्रण करते. शरीरामध्ये विविध प्रकारचे विकर तयार होण्यासाठी मदत करते.

उपचार

जनावराला नियमित खाद्यातून कॅल्शियमयुक्त क्षार मिश्रणे द्यावीत.मोठ्या जनावरांत ५० ते १०० ग्रॅम तर लहान जनावरांत १५ ग्रॅम द्यावे. जनावराला द्विदल पिकाचा पालेदार चारा द्यावा. दुग्धज्वर आजारावर पशुतज्ज्ञाच्या सल्याने उपचार करावेत.

कॅल्शिअमची कमतरता होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय

रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये विशेषतः दुधाळ गाई, म्हशींमध्ये २५ ग्रॅम ते ५० ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे. पशू आहारात लुसर्न किंवा डाळ वर्गीय चाऱ्याचा समावेश असावा. गाई, म्हशीच्या गाभण काळाच्या शेवटच्या १ ते २ आठवड्यात कमी कॅल्शियमयुक्त आहार द्यावा. जनावराची नियमित व्यायाम होईल याची काळजी घ्यावी. पशू तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार जीवनसत्वे “ड ” चे इंजेक्शन गाय,म्हैस विण्याअगोदर एक आठवडा आधी द्यावे.

Leave a Comment

error: Content is protected !!