Capsicum Cultivate : आहारामध्ये भाजीपाल्याला खूप महत्व आहे. कारण यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांसारखी खनिजद्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच अ आणि क जीवनसत्वेदेखील मोठया प्रमाणात असते. साहजिकच भाजीपाल्याचे महत्व वाढले असल्याने शेतकरीवर्ग भाजीपाला लागवडीकडे वळू लागला आहे. यामध्ये अनेकजण सिमला मिरचीचे उत्पादन घेतात.
सिमला मिरची आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते. घरामध्ये तयार केलेली भाजी असो किंवा रेस्टॉरंटमध्ये बनवलेले चायनीज असो, प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्याचे काम सिमला मिरची करत असते. त्यामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारापेठांमध्ये सिमला मिरचीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने या मिरचीच्या लागवडीसाठी हा महिना उत्तम मानला जातो. जर तुम्ही लागवड करत असाल तर रोग आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय तुम्हाला माहिती असावेत.
जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
सिमला मिरचीच्या पानांवर पिवळे प्रभामंडल असणारे लहान लहान ठिपके पाहायला मिळतात. कालांतराने ते तपकिरी किंवा काळे होत जातात. हा रोग टाळण्यासाठी तुम्ही प्रतिकारक वाणांचा वापर करणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर जमिनीमध्ये रोगजनकांना प्रतिबंध करण्यासाठी पीक लागवडीची जागा बदलत राहणे गरजेचे आहे. (Capsicum Cultivate : )
तसेच पिकाच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. कारण असे झाले तर देठ आणि फळांवर खोल जखम पाहायला मिळत असून यामुळे पाने कोमेजून कुजण्याची शक्यता असते. पानांवर जास्त पाणी आणि सिंचन टाळावे. त्याशिवाय रोगाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित झाडे काढून टाकावी ज्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मेटालॅक्सिल किंवा फोसेटाइल-अॅल्युमिनियम बुरशीनाशकाचा वापर करावा.
पाने, देठ आणि फळांवर पांढरे पावडर ठिपके पाहायला मिळतात. हा रोग टाळायचा असेल तर हवेच्या चांगल्या अभिसरणासाठी झाडांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपायासाठी सल्फर किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट-आधारित बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे.
त्याशिवाय सिमला मिरचीची पाने पिवळी पडून कोमेजतात. तर अनेकदा ही पाने पूर्णपणे कोमेजून जातात. जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर रोगमुक्त बियाणे आणि रोपांचा वापर करावा. चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत सिमला मिरचीची लागवड करावी. महत्त्वाचे म्हणजे या रोगासाठी कोणतेही प्रभावी रासायनिक उपचार नसल्याने प्रतिबंध आणि व्यवस्थापन धोरणांवर लक्ष द्यावे. जर तुम्हीही सिमला मिरचीची लागवड करत असताना या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळेल.