पिरॅमिड, शंखासारखा दिसणारा फुलकोबी, शेंगदाण्यासारखी चव ! दर 2200 रुपये प्रति किलो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जगात अनेक विचित्र प्रकारची फळे आणि भाज्या पिकवल्या जातात. काहींचा आकार खूप विचित्र असतो. त्यांना पाहिल्यावर विश्वास बसणार नाही की अशा भाज्या आणि फळांचीही लागवड करता येते. अशीच एक भाजी अमेरिका आणि युरोपमध्ये घेतली जाते. हे पिरॅमिड किंवा समुद्री शेल सारखे दिसते. रोमनेस्को फुलकोबी असे या भाजीचे नाव आहे.

असा आकार का येतो?

रोमनेस्को फुलकोबी भाजीला दाणेदार फुलासारखा आकार असतो. फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या मते, ही दाणेदार फुले पूर्णपणे विकसित झालेली नसतात. विकास न झाल्यामुळे फुलांच्या कळ्या तशाच राहतात. त्यामुळे ही भाजी विचित्र आकारात येऊ लागते. रोमनेस्को फुलकोबीची अविकसित फुले पुन्हा कोंबांमध्ये वाढतात ते पुन्हा फूल बनण्याचा प्रयत्न करतात, पण अपयशी होतात. ही प्रक्रिया इतक्या वेळा घडते की, एका कळीच्या वर दुसरी, तिच्यावर तिसरी वगैरे अशी पिरॅमिडसारखी स्थिती निर्माण होते. ते हिरव्या पिरॅमिडसारखे दिसते.

आरोग्यासाठीही फायदेशीर

सामान्य कोबीचा आकार पाहिल्यास त्याची प्रत्येक फुले एकमेकांना लागून असतात. तर, रोमनेस्को फुलकोबीच्या बाबतीत असे नाही. त्याची सर्व फुले वेगळी दिसतात. रोमनेस्को फ्लॉवर अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहाने खाल्ले जाते. या हिरव्या रंगाच्या भाजीची चव शेंगदाणासारखी वाटते. शिजवल्यानंतर खूप चवदार लागते. तसेच, ही भाजी व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत मानली जाते. यामध्ये आहारातील फायबर्स आणि कॅरोटीनोइड्स देखील आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

किती आहे किंमत ?

सामान्य कोबीची किंमत किती असेल? कमाल 50 ते 100 रुपये प्रतिकिलो. तथापि, रोमनेस्को फुलकोबीच्या बाबतीत असे नाही. रोमनेस्को फुलकोबी किंमतीच्या बाबतीत इतर कोबीला मागे टाकते. रोमनेस्को फुलकोबी एक किलो खरेदी करायला गेल्यास 2000 ते 2200 रुपये मोजावे लागतात. एक किलो कोबीची ही किंमत सामान्य माणसाला सांगितली तर त्याचा विश्वास बसणार नाही.

error: Content is protected !!