देशी गुरांसाठी केंद्राची खास योजना; पशुपालकांना होणार थेट फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । देशातील जवळपास 95 टक्के पशुपालन हा शेतकरी करत आहे. पशुपालन हे शेतकऱ्याच्या अतिरिक्त उत्पन्नांचे साधनही आपण म्हणू शकतो. मात्र देशातील सुमारे निम्म्या देशी पशुधन जातींचे अद्याप वर्गीकरण झालेले नसून या प्राण्यांच्या देशी प्रजाती ओळखण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर कसरत सुरू आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र स‍िंह तोमर यांनी याबाबत माहिती देत म्हंटल कि, देशी जातीच्या गुरांची ओळख करणे महत्त्वाचे असून भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) या दिशेने काम करत आहे. यासाठी विशेष मोहीमही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशातील पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे आणि देशी प्रजातींचे संरक्षण करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे.

आयसीएआरने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना तोमर म्हणाले, देशी जातीचे प्राणी हे सुद्धा आपल्या देशाची संपत्ती आहेत . शेतकरी आणि पशुपालक यांना देशी प्राण्यांकडून चांगले उत्पन्न सुद्धा मिळत. मात्र देशातील जवळपास निम्म्या पशुधनाचे अजूनही वर्गीकरण झालेले नाही. अशा अनोख्या जाती लवकरात लवकर ओळखल्या पाहिजेत, जेणेकरून या जाती वाचवता येतील आणि यामुळे कृषी क्षेत्र समृद्ध होण्यास मदत होईल. खरं तर हे काम नक्कीच सोप्प नाही. राज्य विद्यापीठे, पशुसंवर्धन विभाग, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या सहकार्याशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही. ICAR ने या सर्व यंत्रणांच्या सहकार्याने मिशन मोडमध्ये देशातील सर्व प्राण्यांच्या जनुकीय संसाधनांचे दस्तऐवजीकरण सुरु केलं आहे असं कृषिमंत्र्यांनी सांगितलं.

शेतकरी मित्रांनो, तुम्हांला घरात बसून जनावरांची खरेदी- विक्री करून एजंट कडे जाणारे पैसे आणि तुमचा वेळ दोन्हीही वाचवू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करून install करा. अँप ओपन करताच यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पशुपालन हा पर्याय दिसेल. त्यावर क्लीक करताच वरच्या बाजूला पशु खरेदी विक्री चा पर्याय दिसेल. तो ओपन करताच तुमच्या आसपासच्या परिसरातील विक्रीसाठी निघालेल्या जनावरांची संपूर्ण यादी, जनावरांचे फोटो, किंमत आणि त्याच्या मालकाचा मोबाईल क्रमांक मिळेल. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. याशिवाय हॅलो कृषी मध्ये तुम्हाला रोजचा बाजारभाव, सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज यांसारख्या सुविधा अगदी मोफत मध्ये मिळतात.

Hello Krushi Download करण्यासाठी Click Here

दरम्यान, नवीन नोंदणी झालेल्या २८ जातींच्या जाती नोंदणी प्रमाणपत्रांचे नुकतेच वितरण करण्यात आले. यामध्ये गुरांच्या 10, डुकराच्या ५ , म्हशीच्या 4, शेळीच्या 3, कुत्र्याच्या 3, मेंढ्यांच्या एक, गाढवांच्या एक, बदकाच्या एक जातीचा समावेश होता. केंद्र सरकारच्या या पावलामुळे या प्रजातींचे अधिक चांगल्या पद्धतीने संरक्षण होणार आहे असं म्हंटल जात आहे.

error: Content is protected !!