Weather Update : आजही राज्यात पावसाची शक्यता कायम; ‘या’ भागाला हवामान खात्याचा यलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात कालही ढगाळ वातावरणासह पावसाने (Weather Update) हजेरी लावली. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आजही राज्यात सर्वदूर पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार आहे.

हवामान स्थिती ?

संपूर्ण वायव्य भारतातून ३ ऑक्टोबर रोजी मॉन्सून (Weather Update) परतला. त्यानंतर मात्र परतीच्या वाटचालीत मॉन्सूनची उत्तरकाशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा रविवारी (ता. ९) कायम होती. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. अग्नेय अरबी समुद्रापासून ईशान्य राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

आज या भागाला यलो अलर्ट

आज हवामान खात्याकडून (Weather Update) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र विभागातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. या भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागाला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

error: Content is protected !!