E-Pik Pahani : महत्वाची बातमी ! ‘ई-पीक पाहणी’ प्रक्रियेत बदल, आले आहे ‘ई-पीक पाहणी’ व्हर्जन -2

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद शासनाकडे व्हावी या उद्देशाने राज्य सरकारकडून ‘ई-पीक पाहणी’ (E-Pik Pahani) हे ॲप काढले आहे. आता या ॲपमध्ये करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ व्हर्जन -2 हे मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आतापर्यंत या ॲप मध्ये केवळ पीक पेऱ्याची नोंद केली जात होती मात्र आता पीकविमा योजनेतही सरकारी कंपनी असल्याने नुकसानभरपाईसाठीही या अॅपचा आधार घेतला जाणार का हे पहावे लागणार आहे.

ॲप बाबत महत्वाचे बदल

— 1 ऑगस्टपासून मोबाईल (E-Pik Pahani) अॅप बदलण्यात आले आहे.
–शेतकऱ्यांना चार पिकांचा समावेश करता येणार आहे. यामध्ये एक मुख्य आणि तीन दुय्यम पिकांचा सहभाग राहणार आहे.
–आधीचे ॲप बंद कऱण्यात आले असून शेतकऱ्यांना यंदा त्या संबंधित गटामध्येच जाऊन माहिती भरावी लागणार आहे.
— शिवाय चुकीची माहिती अदा केली तर अॅप ते स्विकारत नाही.

नव्या ॲपची वैशिष्ट्ये

— एक मुख्य आणि तीन दुय्यम पिकांचा समावेश करता येणार आहे.
–दुय्यम पिकांच्या लागवडीचा दिनांक हंगाम व क्षेत्र नोंदवण्याचीही (E-Pik Pahani) देखील सोय करण्यात आली आहे.
–त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती मिळण्यासही मदत होते.
–शिवाय शेतकऱ्यांना माहिती भरताना अडचणी निर्माण झाल्या तर त्याचे निराकरण करण्यास अॅपमध्येच बटन देण्यात आले आहे. जेणेकरुन नेहमी विचारले जाणारे प्रश्नांची उत्तरेही तिथे असणार आहेत.
–नोंदवलेली माहिती जर चुकीची असेल तर शेतकऱ्यांना एकवेळ दुरुस्त करण्याची संधी असणार आहे. मात्र, दुसऱ्यांदा माहिती भरताना योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे. शिवाय यासाठी कृषी सहायकांचे मार्गदर्शन घेणेही गरजेचे आहे.

ऑडिओ क्लिप ची घेता येणार मदत

या मोबाईल अॅपमध्ये कायम पडिक क्षेत्र, बांधावरची झाडी, पिकांची माहिती, गावाची माहिती, गावाची पीक पाहणी इत्यादीची माहिती देणारे ऑडिओ क्लिप त्यामध्ये असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती भरताना अडचणी निर्माण होणार नाही. शिवाय अडचणी निर्माण झाल्या तरी त्या सोडवायच्या कशा याचा फॉर्म्युलाही अॅपमध्येच (E-Pik Pahani) असणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!