हॅलो कृषी ऑनलाईन: आजपर्यंत आपण कोळशाचे वेगवेगळे उपयोग (Charcoal Uses In Agriculture) बघितले आहेत, सध्या तर टूथपेस्ट मध्ये चारकोल म्हणजेच कोळशाचा वापर केला जातो अशा जाहिराती सुद्धा येतात. परंतु शेतकरी बंधुंनो तुम्हाला माहित आहे का या कोळशाचा खत (Charcoal Fertilizer) म्हणून सुद्धा वापर करू शकता. कोळसा जमिनीची सुपीकता (Soil Fertility) वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही बाजारातून कोळसा विकत घेऊ शकता किंवा घरी बनवू शकता. कोळशाचा उपयोग शेतात (Charcoal Uses In Agriculture) कसा करता येईल हे जाणून घेऊया.
चारकोल म्हणजे लाकूड कोळसा, तुम्ही त्याचा खत म्हणूनही वापर करू शकता. चारकोल किंवा बायोचार शेतीसाठी खूप फायदेशीर ठरतात आणि जमिनीची सुपीकता वाढवतात. तुम्हाला हवे असल्यास ते तुम्ही घरी बनवू शकता किंवा बाजारातून विकले जाते, ते विकत घेऊन शेतात टाकू शकता (Charcoal Uses In Agriculture).
घरी कोळसा कसा बनवायचा (How To Prepare Charcoal At Home)
जर तुम्हाला ते घरी बनवायचे असेल तर तुम्ही ड्रम पद्धत वापरू शकता. जे हैदराबाद येथील सेंट्रल रेनफेड कृषी संशोधन संस्थेने तयार केले आहे. त्यात एक ड्रम असतो ज्यामध्ये कोळसा तयार केला जातो. या पद्धतीत बायोमासचे अवशेष ड्रममध्ये ठेवून त्याला आग लावली जाते. हा ड्रम 90-95 मिनिटे चुलीवर ठेवला जातो. नंतर ते खाली उतरवले जाते, त्याचे झाकण बंद केले जाते आणि त्यावर ओली माती झाकली जाते. यापासून कोळसा तयार केला जातो.
शेतकरी आपल्या शेतात या कोळशाचा वापर करून पीक उत्पादन वाढवू शकतात. पेरणीपूर्वी आणि उभ्या पिकात शेताची नांगरणी करताना 10-15 सेमी खोलीवर कोळशाची भुकटी टाकावी. हे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात किंवा लहान प्रमाणात अनेक वेळा वापरले जाऊ शकते. काही प्रमाणात खत कमी करून आणि त्या जागी काही प्रमाणात बायोचार वापरूनही उत्पादनात वाढ करता येते (Charcoal Uses In Agriculture).
कोळशाचे फायदे (Charcoal Benefits)
कोळसा पिकांसाठी कितपत फायदेशीर आहे हे तो कोणत्या तापमानाला तयार होतो यावर अवलंबून असतो. जर तापमान जास्त असेल तर त्यातील पोषक द्रव्ये मरतात, तर 500-600 अंश सेल्सिअस तापमानात तयार केलेला कोळसा जमिनीला अधिक फायदे देतो. अशा कोळशामुळे जमिनीची सुपीकता वाढते. कमी तापमानात बनवलेल्या कोळशामध्ये किंवा बायोचारमध्ये पोषक तत्वे नष्ट होत नाहीत. त्यामुळे ते शेतीसाठी योग्य मानले जाते. कोळशामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते.
पीक उत्पादन वाढवण्याबरोबरच कोळशामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. पीक पेरण्यापासून ते तयार होईपर्यंत कोळशाचा वापर करता येतो. हे पिकांना सुरुवातीच्या अवस्थेतच अधिक पोषक तत्वे पुरवते, ज्यामुळे त्यांची वाढ सुधारते. त्यामुळे झाडांची मुळे, देठ, फुले, फळे यांची चांगली वाढ दिसून येते. कोळशामुळे जमिनीची आम्लताही कमी होते आणि सामू (pH) सुद्धा योग्य राहते (Charcoal Uses In Agriculture) .