घरबसल्या चेक करा तुमच्या जनधन खात्यातील बॅलेन्स; जाणून घ्या

PM Jan Dhan Yojna
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आतापर्यंत अनेकांनी जनधन खात्याचे फायदे घेतले आहेत. आता जनधन खात्यासंदर्भात तुम्ही आणखी एक फायदा घरबसल्या मिळवू शकता. तुमच्या जनधन खात्यामध्ये किती बॅलेन्स शिल्लक आहे याची माहिती तुम्ही घरबसल्या केवळ एक मिस्ड कॉल देऊन घेऊ शकता. मात्र याकरिता तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्डाशी जोडणे गरजेचे आहे.

पोर्टल द्वारे बॅलेन्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

–तुम्ही https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या पोर्टलवर जाऊनही जनधन खात्यातील रक्कम तपासू शकता.
–याठिकाणी तुम्हाला Know your Payment हा पर्याय निवडावा लागेल.
–त्यानंतर तुमचा अकाऊंट नंबर आणि कॅप्चा कोड भरून तुम्हील बॅलन्स जाणून घेऊ शकता.

फक्त एक मिस कॉल द्या आणि जाणून घ्या तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्स

— 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्ही जनधन खात्याचा बॅलन्स जाणून घेऊ शकता.
–मात्र, त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड असला पाहिजे.

काय आहे जनधन खाते?

मोदी सरकारने 2014 मध्ये ‘जनधन’ योजनेला सुरुवात केली. या योजनेद्वारे सर्व नागरिकांना बँकिंग सिस्टम कशी जोडणे हे सरकारचे लक्ष्य होते. योजनेअंतर्गत तुम्ही देखील खाते सुरू करू शकता. आतापर्यंत जवळपास 41 करोड पेक्षा जास्त लोकांनी जनधन खाते सुरू केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये 55 टक्के महिलांचा देखील सहभाग आहे.

जाणून घेऊया जुन्या सेविंग खात्याला ‘जनधन’ खात्यामध्ये कसे कन्व्हर्ट कराल

–सर्वात आधी तुमच्या जवळच्या बँकेच्या ब्रांच मध्ये जा.
— इथे तुम्हाला रूपे कार्ड (RuPay Card) घेण्यासाठी अर्ज करावा लागेल.
— त्यानंतर हा अर्ज बँकेत जमा करा.
— या फॉर्मच्या आधारे आपले खाते जनधन खात्यामध्ये कन्व्हर्ट होईल.

जन धन खात्याचे फायदे

–दोन लाखांपर्यंतचा अपघात विमा या योजनेत समाविष्ट आहे.
–यासह, 30 हजार रुपयांपर्यंतचे आजीवन संरक्षण उपलब्ध आहे, जे पात्रता अटी पूर्ण केल्यावर लाभार्थीच्या मृत्यूवर दिले जाते.
–या खात्याअंतर्गत विमा, पेन्शन उत्पादने खरेदी करणे सोपे आहे.
–खाते उघडणार्‍याला रूपे डेबिट कार्ड मिळते, ज्यामधून तो खात्यातून पैसे काढू शकतो. याशिवाय शॉपिंगही करता येते.
–शासकीय योजनांचे थेट पैसे या खात्यात येतात.
–मनी ट्रान्सफरची सुविधा देशभरातही उपलब्ध आहे.

जन धन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

–पासपोर्ट
–चालक परवाना
–पॅन कार्ड क्रमांक
–मतदार ओळखपत्र
–मनरेगा जॉब कार्डवर राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने सही केली असेल.

जन धन खात्यासह इतर सुविधा उपलब्ध आहेत

–या खात्याअंतर्गत ठेवींवरील व्याजाची सुविधादेखील उपलब्ध आहे.
–मोफत मोबाइल बँकिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.
–ओव्हरड्राफ्टद्वारे 10,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त रक्कम खात्यातून काढता येईल.
–या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
–आपल्याला चेक बुकची सुविधा हवी असल्यास आपणास किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे