Chia Planting : गहू- हरभरा पिकाला पर्याय म्हणून चिया लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । गहू तसेच हरभरा पिकाला पर्याय म्हणून वाशिम जिल्ह्यातील शेतकरी चिया पिकाकडे (Chia Planting) वळला आहे. चिया पिकाला कोणतीही रासायनिक फवारणीची गरज नाही. वन्यप्राणीही या पिकाला खात नाहीत त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत चिया पिकाचा उत्पादन खर्च कमी असूनही दरही चांगला मिळत असतो.

दरवर्षी रब्बी हंगामामध्ये हरभरा हे पीक घ्यायचो. मात्र हरभरा पिकाला मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे नुकसान त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नव्हते. म्हणून मी चिया पिकाकडे वळलो. चिया पिकाची (Chia Planting) माहिती मिळाली. या पिकाचे उत्पादन चांगले आहे. तसेच दरही चांगला मिळतो. या पिकाला फक्त पाण्याची गरज असते. फवारणी किंवा खताची आवश्यकता नसते, असे येथील शेतकरी सांगतात.

एक एकरमध्ये किती उत्पादन होते- Chia Planting

चिया हे पीक पेरणीनंतर 110 ते 115 दिवसांनी कापणीसाठी तयार होते. या काळात झाडे पूर्णपणे उपटून झाडे ५ ते ६ दिवस उन्हात व्यवस्थित वाळवली जातात. थ्रेशर मशिनच्या सहाय्याने या वाळलेल्या झाडांपासून बिया काढल्या जातात आणि वेगळ्या केल्या जातात. एक एकर क्षेत्रातून अंदाजे ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळते.

चियाचे आरोग्यदायी फायदे

चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. याशिवाय कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि अनेक खनिजे यांसारखे पोषक घटक त्यात आढळतात. चिया बियांचे सेवन केल्याने हृदय आणि शरीराला रोगांशी लढण्यासाठी शक्ती मिळते. अमेरिका आणि चीननंतर आता भारतातही चिया बियांचे पीक बहरत आहे. वास्तविक, परदेशी बाजारपेठेत चिया बियांना ‘सुपर फूड’ म्हणून ओळखले जाते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

error: Content is protected !!