हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसांपासून जोरात असलेले मिरचीचे भाव (Chilli Rate) अचानक आवक वाढल्यामुळे 50 टक्क्यांनी गडगडले आहे. दोन दिवसांपूर्वी मिरचीचे भाव 110 रुपये किलो एवढे होते, परंतु ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने 50 टक्क्यांनी भाव (Chilli Rate) कमी झाले आहेत.
जालना जिल्ह्यातील (Jalna District) भोकरदन तालुक्यातील धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक (Chilli Market) झाली आहे. त्यामुळे भावात अचानक घसरण झालेली पाहायला मिळत आहे.
त्यामुळे रेणुकाई पिंपळगाव येथील बाजारपेठेत शेतकर्यांवर मिरची 50 रुपये प्रति किलोने विकण्याची वेळ आली आहे. बाजारपेठेत दररोज शेतमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी (Chilli Farmers) हवालदिल झाले आहेत. सुरुवातीला 10 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर (Chilli Rate) पोहोचले होते.
त्यापाठोपाठ 9 ते 10 हजारापर्यंत भाव खाली आले. परंतु, बुधवारी हे भाव तर 5 ते 6 हजारावर आल्याने शेतकर्यांचा फवारणी, निंदणीसह तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे. यंदा तालुक्यात मिरचीची लागवड (Chilli Cultivation) मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे बाजारात सर्वाधिक हिरवी मिरची दाखल झाली आहे. एका शेतकर्याला एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च लागला आहे.
एप्रिल पासून मिरचीचा दुसरा तोडा तोडणे सुरू आहे, सुरुवातीला काळी मिरचीला 110 रुपये किलो दर (Chilli Rate) होता. आता ही मिरची 50 रुपये किलोने विक्री होत आहे. सुरुवातीचे भाव चांगले असल्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, बुधवारी अचानक भाव (Chilli Rate) कमी झाल्याने शेतकर्यांतून नाराजीचा सूर पसरला आहे.
यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यांत मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची (Summer Chilli) लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. परंतु, 10 जुलै रोजी अचानक भावात घसरण झाल्याने शेतकर्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. यात तोडणीची मजूरी, गाडीभाडेही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
यंदा उन्हाळी मिरचीची सर्वाधिक लागवड
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे. चांगला भाव मिळतो, म्हणून मे महिन्यात काही शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून मिरचीची लागवड केली.
त्यामुळे सध्या भोकरदन तालुक्यासह इतर भागांत मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. त्यामुळे धावडा, रेणुकाई पिंपळगाव बाजारपेठेत आवक वाढल्याने मिरचीचे दर घसरून त्याचा फटका मिरची उत्पादक शेतकर्यांना बसला आहे.
तोडणीसाठी द्यावे लागते 5 रू. प्रति किलोने पैसे
मिरचीचे रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकर्यांना एका एकरसाठी अंदाजित 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. यात एक किलो मिरची तोडण्यासाठी (Chilli Harvesting Expenses) 5 रुपये मजुरी द्यावी लागते. यंदा तोडणी आणि वाहतूक खर्च (Chilli Transport Expenses) वाढल्याने शेतकरी (Farmer) अडचणीत सापडले आहेत.
बाजारपेठेत ठोक मिरचीचे भाव (Chilli Rate)
पूर्वीचे दर | बुधवारचे भाव | |
काळी मिरची | 120 | 50 |
रुवेलरी (पांढरी) | 80 | 45 |
शिमला | 60 | 25 |
बळीराम | 70 | 30 |
पिकेडोर | 80 | 35 |