Chinta Mango Variety: वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण अंतर्गत नोंदणीकृत झाला ‘चिंता’ हा आंब्याच्या वाण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: PPVFRA अंतर्गत ‘चिंता’ या आंब्याच्या जातीला (Chinta Mango Variety) नोंदणीकृत करण्यात आले आहे. वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण (PPVFRA) अंतर्गतचिंता आंब्याची यशस्वी नोंदणी झाली आहे. ही नोंदणी अन्य कृषी वाणांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

पोर्ट ब्लेअरमधील ICAR-सेंट्रल आयलँड ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (ICAR-CIARI) ने वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण (PPVFRA), नवी दिल्ली अंतर्गत ‘चिंता आंबा’ या अनोख्या आंब्याच्या जातीची (Chinta Mango Variety) नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही ऐतिहासिक नोंदणी PPVFRA अंतर्गत आंब्याच्या जातीला (Mango Variety) प्रथमच मान्यता देण्यात आली आहे.

शहीद द्विप येथील प्रगतशील शेतकरी चिंताहरन बिस्वास हे ‘चिंता’ या आंब्याच्या वाणाचे संशोधक आहेत. 100 आंब्याच्या बागेत, चिंताहरन बिस्वास यांनी या विशिष्ट जातीचे दस्तऐवजीकरण आणि विकास करण्यासाठी ICAR-CIARI सोबत मिळून काम केले आहे.

चिंता आंब्याला (Chinta Mango Variety) मिळालेली ही ओळख चिंताहरन बिस्वास यांचे समर्पण आणि त्यांना ICAR-CIARI द्वारे मिळालेला पाठिंबा यामुळे शक्य झाले आहे.  

चिंता आंब्याची वैशिष्ट्ये (Chinta Mango Variety Characteristics)

  • चिंता आंबा अनेक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. कच्च्या अवस्थेत या फळाची साल जांभळ्या रंगाची असते जे या आंब्याला इतर जातींपेक्षा वेगळे ठरवणारे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे.
  • मोठी फळे 300-400 ग्रॅम वजनाची असतात, त्यात मधुर पिवळा गर असतो आणि त्यात फायबर कमी असते.
  • फळांचे सरासरी एकूण विरघळणारे घन पदार्थ (TSS) 19.6°B नोंदवले जातात, ज्यामुळे यात उच्च साखरेचे प्रमाण असते, आणि चवीला हा आंबा खूपच मधुर असतो.
  • या आंब्यात कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, एस्कॉर्बिक ऍसिड आणि त्यातील महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडंट आहेत.
  • या आंब्याचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे पॉलीएम्ब्रीओनिक रोपे, बीजोत्पादनाद्वारे या आंब्याची शुद्धता राखली जाते.

PPVFRA अंतर्गत ‘चिंता’ या आंब्याची (Chinta Mango Variety) नोंदणीमुळे बिस्वास यांच्या नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा सन्मान झालेला आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा संशोधन कार्यासाठी एक आदर्श निर्माण झालेला आहे. या यशामुळे देशी वाणांचे जतन आणि मान्यता यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.