राज्यात हवामानात बदल कायम; जळगावात उष्माघाताने मृत्यू

Death due to heatstroke
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस धुमशान माचवत आहे. तर मधूनच उन्हाचा चटका संपूर्ण राज्यात पहायला मिळत आहे. याचा परिणाम हा जनतेच्या जीवाला झाला आहे. उष्मघाताने जळगाव जिल्ह्यातील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता राज्यातील नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

जळगाव जिल्ह्यात उष्णतेत वाढ होत असून शेतपिकांवर मोठा परिणाम होत आहे. अशातच उष्मघाताने मृत्यू झालेल्या नम्रता चौधरी धार्मिक कार्यक्रम आटोपून उन्हाच्या झळा सोसत घरी येत असताना त्यांच्यावर उष्माघाताचा विपरीत परिणाम झाला. यामुळे पित्त होऊन उलट्या, मळमळल्याने त्या बेशुद्ध स्थितीत पडल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गेली दोन महिने अवकाळी पाऊस सुरू होता. यामुळे फारसा उन्हाचा तडाखा जाणवला नाही. याचा परिणाम हा नागरिकांवर होतोय. यामुळे आता डॉक्टरांनी या उष्मघातापासून वाचण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन केलं आहे. सध्या वातावरणात ४० अंशाहून अधिक तापमान पहायला मिळत आहे.

काल जळगाव जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक तापमान वाढले :

जळगाव जिल्ह्यात काल ४५ अंश सेल्सिअस तापमान पहायला मिळत आहे. अशातच बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ सुरू आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य सोडून इतर ठिकाणी अवकाळी पाऊस होणार असून आपल्या उन्हाचा चटका कायम राहणार आहे. यामुळे आता पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. अनेक ठिकाणी पारा ४० च्या वर गेला आहे. पाऊस लांबला असून पावसामध्ये वाढ होईल. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.