हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

नवलच…! आता येणार रंगीत बटाटे, कोरोना काळात वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यापूर्वी तुम्ही रंगीत किंवा सप्तरंगी कणसाबद्दल ऐकलं असेल किंवा लाल भेंडी बद्दल ऐकलं असेल मात्र आता ग्राहकांना रंगीत बटाटे सुद्धा उपलब्ध होणार आहेत. कोरोना काळात रोगप्रतिकारक्षमतेत वाढ करु शकणारा बटाटा विकसित केला जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की ग्वाल्हेर मधील आलू अनुसंधान केंद्रात त्याचे नवे वाण विकसित करण्यात आले असून लवकरच ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या केंद्राच्या संशोधकांनी बरंच संशोधन करून हे रंगीत बटाट्याची नवी प्रजाती विकसित केली आहे तिच्यामध्ये झिंक, आयर्न आणि कॅटरिन हे घटक मोठ्या प्रमाणात आहेत. वैज्ञानिकांचा दावा आहे की या बटाट्याच्या सेवनानं रोगप्रतिकारक क्षमता वाढवून कोरोनाशी चांगला मुकाबला करता येणे शक्य आहे. तसेच लहान मुलांमध्ये आणि महिलांमधील एनिमिया म्हणजेच रक्तातील कमतरता त्याची समस्या या बटाट्याच्या सेवनाने दूर होऊ शकते.

या बटाट्याचा बाह्य नव्हे तर आतील भाग रंगीत असेल. असे बटाटे खाल्ल्याने शरीरातील आयर्न म्हणजेच लोह तत्त्वाची कमतरता ही दूर होईल. गर्भवती महिलांना अशा बटाट्याच्या सेवनाचा लाभ मिळू शकेल चीन नंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश आहे आता हे रंगीत बटाटे लोकांना अधिक आकर्षित करतील.

error: Content is protected !!