पाथरी तालुक्यात 15 वनराई बंधाऱ्यांची उभारणी; रब्बी हंगामातील पीकांना मिळणार पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी

कृषी विभाग पंचायत समिती यांच्या वतीने लोकसहभागतुन तालुक्यातील विविध गावांमध्ये वनराई बंधारे उभारले जात आहेत. या बंधाऱ्यांमुळे शेतशिवारातील पाणी पातळीत वाढ होणार असून रब्बी पिकांना पाणी उपलब्ध होणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी अनिल सिरसाट , कृषीविकास अधिकारी मधुकर कदम , बलसेटवार एस.पी यांच्या नेतृत्वात कृषी विस्तार अधिकारी एस. के . सय्यद , बी .बी खरात , एस.एच. म्हेत्रेवार व कृषी विभाग पंचायत समिती पाथरी यांच्या पुढाकारातून पाथरी तालुक्यातील विविध गावांमध्ये १५ वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे . हादगाव ,झरी ,पाथगव्हाण बु , पाथरगव्हाण खु , देवनांद्रा व पोहेटाकळी आदी गावातील शेतशिवारातील नदी नाल्यांवर हे वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत .या बंधार्यांमुळे आजूबाजूच्या विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे . त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्ध होणार आहे .याशिवाय पशुपक्षी , जनावरांच्या पाणी उपलब्ध होणार आहे.

वनराई बंधार्यांची उभारणी करताना संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रापंचायत कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. लोकांनी स्वतः पुढे येऊन आपल्या जवळील ओढ्या, नाल्या वर अश्या प्रकारचे वनराई बंधारे बांधून अमूल्य पाण्याचा वापर केला पाहिजे, असे आवाहन कृषी विभाग पंचायत समिती पाथरी कडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!