Coriander price : मागच्या काही दिवसापासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. टोमॅटो पाठोपाठ आता लसणाचे देखील भाव चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला खरेदी करण्यास मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. बाजारामध्ये सध्या भाजीपाल्याची आवक कमी आहे त्यामुळे भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ज्यावेळी भाजीपाल्याची आवक बाजारात जास्त येईल त्यावेळी भाजीपाल्यांचे दर कमी होतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र सध्या कोथिंबीर शेतकऱ्यांना रडवताना दिसत आहे. कोथिंबीरीला भाव नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान सांगली मधील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीचे भाव घसरल्यामुळे शेतात ट्रॅक्टर फिरवला असल्याची माहिती समोर आली आहे.
कोथिंबिरीच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी हतबल (Coriander price)
मागच्या काही दिवसापूर्वी कोथिंबीरला चांगला भाव मिळत होता. त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते. मात्र अचानक बाजारामध्ये कोथिंबीरची आवक वाढल्याने कोथिंबिरीला कमी भाव मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे. अनेक शेतकरी शेतामध्ये ट्रॅक्टर फिरवत आहे तर काही शेतकरी मार्केटमध्येच कोथिंबीर फेकून देत आहेत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
सांगलीतील शेतकऱ्याने उभ्या कोथिंबिरीत फिरवला ट्रॅक्टर
सांगली जिल्ह्यातील युवा शेतकरी शंकर गायकवाड हे माळव्यासाठी प्रसिद्ध असणारे युवा शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या वीस गुंठे क्षेत्रावर केलेल्या कोथिंबीरीला भाव मिळत नसल्याने रोटर फिरवला आहे. एका बाजूला टोमॅटोला मिळत असलेला उच्चांकी दर तर दुसरीकडे कोथंबिरीचे पडलेले दर यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कोथिंबीरीची पेंडी विकली जाते दोन रुपये दराने
शंकर गायकवाड हे मागच्या दहा ते बारा वर्षापासून भाजीपाल्याची लागवड करत आहेत. त्यांनी यापूर्वी देखील कांदा, कोथिंबीर, वांगी, मिरची, मेथी, टोमॅटो यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले आहे. त्यामधून त्यांना चांगला नफा देखील मिळाला आहे. मात्र सध्या कोथींबीरीच्या पेंडीला फक्त दोन रुपये दर मिळत आहे. यामुळे शेतात झालेला खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतला आहे.
इथे पाहता येतील तुम्हाला कोथिंबिरीचे भाव
शेतकरी मित्रांनो तुम्हाला पालेभाज्या किंवा इतर शेतमाल विकण्याआधी त्याचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला बाजारभाव हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या भाजीपाल्याचे बाजारभाव पाहिजे आहेत त्या भाजीपाल्याचे बाजार भाव पाहता येतील त्यामुळे लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.
सोलापूरमध्येही शेतकऱ्यांनी रस्त्यावर कोथिंबीर दिली फेकून
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी रस्त्यावर कोथिंबीर फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. बीड मधील काही शेतकऱ्यांनी कोथिंबीर विकण्यासाठी सोलापूर या ठिकाणी आणली होती. मात्र त्या ठिकाणी कोथिंबिरीला योग्य तो भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी थेट रस्त्यावरच कोथिंबीर फेकून दिली.