हॅलो कृषी ऑनलाईन: निसर्गाने आपल्याला (Corn Silk) वेगवेगळी फळे, फुले, भाजीपाला, अन्नधान्ये दिलेली आहेत. यातील सर्वांचा दैनंदिन जीवनात आपण वापर करतो. परंतु या सर्व अन्नधान्यात काही टाकावू पदार्थ असतात ज्यांची उपयुक्तता आपल्याला माहित नसते. असाच एक पदार्थ आहे मक्याचे धागे (Corn Silk).
पावसाळा सुरू झाला की गरमागरम भाजलेल्या मक्याचे कणीस ज्याला भुट्टा सुद्धा म्हणतात आपण फार आवडीने खातो. हा भुट्टा विकणारे मक्याच्या सालीसह त्यातील पांढरे धागेही कचरा म्हणून फेकतात. या मुलायम आणि चमकदार धाग्यांना कॉर्न सिल्क म्हटले जाते. या धाग्याचे महत्व (Corn Silk Benefits) अनेकांना माहीत नाही.
कॉर्न सिल्कमध्ये (Corn Silk) स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हे हृदयरोग (Heart Disease) आणि कोलेस्ट्रॉलपासून (Cholesterol) बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाणही नियंत्रित राहते.
ताज्या किंवा वाळवलेल्या दोन्ही स्वरुपात कॉर्न सिल्कचा (Corn Silk) वापर केला जाऊ शकतो. अनेक आजारांच्या औषधांमध्येही (Corn Silk Medicinal Uses) याचा वापर केला जातो. ब्लेडरमध्ये इन्फेक्शन, यूरिनरी सिस्टीममध्ये सूज, किडनी स्टोन, डायबिटीज, जन्मापासून हृदयाची समस्या, हाय ब्लड प्रेशर आणि चक्कर येणे असा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. जाणून घेऊ कॉर्न सिल्कचे इतरही फायदे.
कॉर्न सिल्कचे फायदे (Corn Silk Health Benefits)
हाय ब्लड शुगर कमी करत: हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त लोकांसाठी मक्याचे हे धागे फायदेशीर आहेत. याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि शुगरचे प्रमाण कमी केले जाते.
व्हिटॅमिन सी स्त्रोत: मक्याच्या धाग्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी (Vitamin C Source) असत. हे एक चांगलं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि हृदयासंबंधी रोगापासून याने बचाव होण्यास मदत मिळते. तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला होतो.
किडनीची समस्या दूर करते: किडनीच्या समस्येवर (Kidney Problems) घरगुती उपाय करायचा असेल तर कॉर्न सिल्कचा वापर करू शकता. याने यूटीआय, ब्लेडर, इन्फेक्शन, किडनी स्टोन, यूरिनरी सिस्टममध्ये सूज येणे अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते.
डोकेदुखी पासून आराम: सतत तुम्हाला डोकेदुखीची समस्या होत असेल तर तुम्ही कॉर्न सिल्क टी चे सेवन करू शकता. यात अॅंटी-इंफ्लेमेटरी (Anti-Inflammatory Properties) आणि ऐनलगेसिक गुण असतात. याने तुम्ही स्ट्रेस आणि टेन्शन फ्री होऊ शकता. इतकेच नाही तर खांदेदुखी, मान दुखणे, जबडा अडकणे अशाही समस्या याने दूर होण्यात मदत मिळू शकते.
पचनक्रिया चांगली राहते: कॉर्न सिल्कने शरीराची पचनक्रिया (Digestion) चांगली राहते. काही रिसर्च मधून हे सिद्ध झाले आहे की मक्याचे हे धागे लिवर द्वारे बाइल सेक्रेशनला वाढवतात. बाइल गालब्लेडरमध्ये एकत्र होतात, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होतं.
वजन कमी करण्यास मदत: कॉर्न सिल्कमध्ये कॅलरी कमी (Low Calorie) असतात, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास (Weight Loss) मदत होते. यापासून तयार चहा सेवन केल्याने पोट भरलेले राहते आणि याने शरीर डिटॉक्स (Body Detox) होण्यासही मदत मिळते.
त्वचेसंबंधी समस्या होतात दूर होतात: कॉर्न सिल्कने (Corn Silk) त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या (Skin Problems) दूर होतात. खरचटणे, पिंपल्स, खाज, किटक चावणे यापासून आराम मिळतो. यातील अॅंटीबॅक्टेरिअल आणि अॅंटीसेप्टीक गुण त्वचेची रक्षा करतात.
कॉर्न सिल्कचा चहा (Corn Silk Tea)
मक्याचे धागे (Corn Silk) तसेच खाण्याची कोणतीही पद्धत नाहीये. तुम्ही याचं सेवन चहाच्या रूपात करू शकता. एका भांड्यात पाणी उकडा आणि त्यात ताजे कॉर्न सिल्क टाका. काही मिनिटे हे उकडून थंड होऊ द्या. काही वेळाने या चहाला भुरका रंग येईल. त्यानंतर हा चहा गाळून घ्या. याची टेस्ट चांगली करण्यासाठी तुम्ही यात लिंबाचा रसही घालू शकता.
तर पुढच्या वेळी जर तुम्हाला चहा प्यायची इच्छा होत असेल तर कॉर्न सिल्कचा चहा ट्राय करून बघायला हरकत नाही.