Cotton Boll Rot: कापूस पिकावर होतोय बोंडसड रोगाचा प्रादुर्भाव, वेळीच करा ‘हे’ उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सततचा आणि जास्त पाऊस, (Cotton Boll Rot) ढगाळ वातावरण आणि हवेतील अति आर्द्रता यामुळे कापूस पिकात (Cotton Crop) हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या (Cotton Diseases) प्रामुख्याने बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत आढळत आहे, यालाच बोंडसड (Cotton Boll Rot) असे म्हणतात. अशी बोंडे बाहेरून निरोगी दिसत असली तरी अशी हिरवी बोंडे फोडून बघितल्यावर आतील रुई व बिया प्रामुख्याने पिवळसर – गुलाबी ते लाल रंगाच्या होऊन सडल्याचे आढळते. साधारणतः बोंडातील एक ते दोन कप्पे, तर काही ठिकाणी संपूर्ण बोंड सडल्याचे आढळले. अनेक ठिकाणी बोंडसडचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून येतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जाणून घेऊ या या रोगाची कारणे आणि उपाय.

बोंडसड रोगाची कारणे (Causes Of Cotton Boll Rot)

  • जास्त पाऊस, सतत ढगाळ वातावरण आणि हवेतील अति आर्द्रता बोंडसड साठी पोषक वातावरण आहे.
  • रोगकारक बुरशी, जीवाणू, रस शोषक ढेकूण व किडी यांच्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो.

बोंडसड प्रकार (Types Of Cotton Boll Rot)

बाह्य बोंडसड/बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग: या प्रकारात मुख्यत: काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोंडावरील जीवाणू कारणीभूत असतो.

आंतरिक बोंडसड: कमी प्राणवायु अवस्थेत तग धरणारे जीवाणू, रोगकारक जीवाणू आणि काही प्रमाणात रोगकारक बुरशीच्या संसर्गामुळे आंतरिक बोंडसड (Cotton Boll Rot) होते. अशी बोंडे बाहेरून निरोगी दिसतात. मात्र आतील रुई पिवळसर-गुलाबी ते लाल-तपकिरी रंगाची होऊन सडते. विकसित अवस्थेतील बियासुद्धा सडल्याचे आढळतात.

बोंडसड रोगाचे एकात्मिक नियंत्रण (Cotton Boll Rot Management)

  • सिंचन आणि नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा.
  • चांगल्या व्यवस्थापन पद्धतींद्वारा कापूस पिकाची अतिवाढ रोखावी.
  • लाल रंगाच्या ढेकणापासून पिकाचे संरक्षण करावे.बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी खालील प्रमाणे फवारणी करावी. कार्बेन्डाझिम (12 टक्के) + मॅन्कोझेब (63 टक्के डब्ल्यू.पी.) (संयुक्त बुरशीनाशक) 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
  • किंवा कार्बेन्डाझिम (50 टक्के डब्ल्यू.पी.) 0.4 ग्रॅम किंवा मेटीराम (55 टक्के) + पायराक्लोस्ट्रोबिन (5 टक्के डब्ल्यू.जी.) 2 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (25 टक्के ई.सी.) 1 मि.लि. किंवा ॲझोक्सीस्ट्रॉबीन (18.2 टक्के डब्ल्यू/डब्ल्यू) + डायफेनोकोनॅझोल (11.4 टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) 1 मि.लि. किंवा प्रोपीनेब (70 टक्के डब्ल्यू.पी.) 2.5 ते 3 ग्रॅम आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून दुसरी फवारणी करावी.

error: Content is protected !!