Cotton Crop :महाराष्ट्रामध्ये अनेकजण कापसाची लागवड करतात. जुलै महिन्यामध्ये पाऊस झाल्यानंतर कापसाच्या लागवडीला चांगलाच वेग आला. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. मात्र जुलै नंतर ऑगस्ट मध्ये पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कापूस पिकासह इतर पिके धोक्यात आहेत. पावसाअभावी कापूस पिक सुकू लागले आहे. त्याचबरोबर सध्या ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे कापसावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. (Cotton Crop)
कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील घट होत आहे. मागच्या काही दिवसापासून कापसाचे दर खूप कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कापसावर सध्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक कामाची माहिती आम्ही सांगणार आहोत.
कापसाला सध्या किती बाजार भाव मिळतोय?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापसाला सध्या किती बाजार भाव मिळतो याची माहिती जाणून घ्यायची असेल तर लगेच प्ले स्टोअरवर जाऊन आपले hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही कापसाचे रोजचे बाजार भाव पाहू शकता. त्याचबरोबर इतर शेतमालाचे देखील तुम्ही बाजारभाव पाहू शकता, तेही अगदी मोफत त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
ढगाळ हवामान तयार झाल्याने गुलाबी बोंड अळीचे पतंग कापूस पिकावर घोंगावत आहेत. यामुळे आगामी काळात पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होणार असा दावा केला जातोय. त्यामुळे आता गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखावा हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे मात्र आता शेतकऱ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही आज आम्ही तुम्हाला कुठलीही फवारणी न करता गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण कसे करायचे याविषयी माहिती सांगणार आहोत
फवारणी विना गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण
- यासाठी तुम्हाला तुमच्या पिकाचे सूक्ष्म निरीक्षण करणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये गुलाबी बोंड अळी असलेल्या डोमकळ्या तोडून टाका या तोडल्यानंतर त्यांना शेतापासून दूर टाकून नष्ट कराव्या त्यामुळे याचा प्रादुर्भाव रोखता येईल
- त्याचबरोबर या किडीच्या पतंग नियंत्रणासाठी तुम्ही कामगंध सापळ्यांचा वापर करा, एकरी पाच याप्रमाणे कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास फायदेशीर ठरेल.
- याव्यतिरिक्त कपाशीचे पीक 60 दिवसांचे झाल्यानंतर कृषी विभागातून ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी कीटकाचे ट्रायको कार्ड आणून एकरी दोन ते तीन या प्रमाणात लावू शकता. याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होईल.