हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस (Cotton Market) हे भारतातील सर्वात महत्वाच्या व्यावसायिक पिकांपैकी एक प्रमुख पिक आहे. भारतातील आर्थिक महत्त्वामुळे याला “व्हाइट-गोल्ड” असेही संबोधले जाते. अंदाजे 6 दशलक्ष कापूस उत्पादक शेतकरी आणि 40-50 दशलक्ष कापूस प्रक्रिया आणि व्यापार यामध्ये गुंतलेल्या लोकांचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी कापूस पिक प्रमुख भूमिका बजावते.
कापसाला मागील वर्षी 11 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. यंदाही कापसाचे भाव 10 हजार रुपयांवर जातील असे बोलले जात होते. मात्र सध्या कापूसाचाही भाव साधारण 7 ते 8 हजार रुपयांवर स्थिर आहेत. पुढील एक दोन महिन्यात कापूस भाव कसे राहतील याबाबतचा शासनाचा बाजारभाव अहवाल जाहीर झाला असून आगामी काळात कापसाचे भाव वाढतील? कमी होतील? कि स्थिर राहतील याबाबत शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे.
असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव
शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.
जागतिक स्तरावर भारत हा प्रमुख कापूस उत्पादक देश असून त्यानंतर चीन आणि अमेरिका यांचा क्रमांक लागतो. एकूण जागतिक कापूस उत्पादनात भारताचा वाटा सुमारे 25 टक्के आहे. वर्ष 2022-23 दरम्यान भारतात अंदाजे कापूस उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे तसेच जागतिक स्तरावर अंदाजे उत्पादन ०.७२ टक्क्यांनी वाढणार असल्याचे दिसून येते.
राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत, वर्ष २०२२-२३ दरम्यान मागील वर्षाच्या तुलनेत आयातीत ५५ टक्के वाढ आणि निर्यातीत २३ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक स्तरावर मागील वर्षाच्या तुलनेत आयातीत ३.८४ टक्क्यांनी वाढलेला दिसत असून निर्यातीत १.८१ टक्क्यांनी घट होणार असल्याचे दिसून येते. जागतिक स्तरावर चीन प्रमुख कापूस उपभोक्ता असून चीनचा वाटा ३३ टक्के आहे त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. वर्ष २०२२-२३ मध्ये देशांतर्गत उपभोग देखील राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर २ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा अंदाज दिसून येत आहे. (स्त्रोत: USDA)
सन २०२२-२३ हंगामासाठी कापसाची किमान आधारभूत किंमत लांब धाग्याच्या कापसासाठी रु. ६३८० प्रति क्विंटल व मध्यम धाग्याच्या कापसासाठी रु. ६०८० प्रति क्विंटल इतकी आहे. अकोला बाजारातील कापसाच्या किमती स्थिर आहेत आणि वायदा बाजारातील भावही स्थिर आहेत. MCX प्लॅटफॉर्मवर २४ फेब्रुवारी २०२३ रोजी कापसाच्या वायदा बाजारातील किमती खालीलप्रमाणे आहेत:

गेल्या तीन महिन्यांतील अकोला बाजारपेठेतील कापसाचे सरासरी भाव आणि भारतातील आवक पुढीलप्रमाणे आहे.

पुढील २ महिने कापसाचे बाजारभाव कसे राहतील? (Cotton Market)
कापसाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मार्च महिन्याची किमत रु १८२०० प्रति क्विंटल इतकी राहील असे ग्राह्य धरून (माहितीचा स्त्रोत: USDA / ICAC) तसेच मागील ११ वर्षांच्या किंमतीच्या गुणात्मक व परिमाणवाचक विश्लेषणानुसार तसेच बाजारातील सध्यस्थितीवरून, मार्च २०२३ या कालावधीत अकोला बाजारातील कापसाची संभाव्य किंमत सरासरी रु.८००० ते ८५०० प्रति क्विंटल या दरम्यान राहील. पुढील दोन महिने म्हणजे एप्रिल आणि मे २०२३ पर्यंत कापसाच्या किमतीत उच्च तफावत होण्याची शक् फारच कमी असल्याने किमतीचा कल स्थिर असु शकतो.